शैक्षणिक कामकाज नियोजन - शैक्षणिक दिनदर्शिका - मार्गदर्शक बाबी



शैक्षणिक कामकाज नियोजन - शैक्षणिक दिनदर्शिका - मार्गदर्शक बाबी

बालभारती च्या हीरक महोत्सव निमित्त शैक्षणिक कामकाज नियोजन (शैक्षणिक दिनदर्शिका) वर्ष २०२६-२७

शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, शिक्षण संचालनालय (प्राथमिक), शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), Designing, Typesetting and Printing by Runa Graphics, Pune यांचे सौजन्याणे प्रकाशित शैक्षणिक कामकाज नियोजन (शैक्षणिक दिनदर्शिका) वर्ष २०२६-२७ खालीलप्रमाणे

शैक्षणिक कामकाज नियोजन (शैक्षणिक दिनदर्शिका) वर्ष २०२६-२७ शैक्षणिक कामकाज नियोजन




दैनंदिन करावयाची कामे :-

१. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधनतंत्रे, अध्यापनपद्धती यांचे नियोजन करून वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करणे, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे.

२. शाळेचा परिसर, स्वच्छतागृह, वर्गखोल्या, पिंक रूम, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादींची स्वच्छता करून परिपाठ घेणे. (हात धुणे, शरीर स्वच्छता, मूल्यसंस्कार आणि वडीलधाऱ्यांना नमन)

३. 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत आहार वाटप करणे व लाभार्थी संख्येची PM Poshan पोर्टलवर नोंद करणे.

४. VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे.

दरमहा करावयाची कामे :-

१. अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे.

२. शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना प्रशिक्षण देणे. (५० तास CPD)

३. विविध स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

४. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे. विविध शैक्षणिक साहित्यनिर्मिती करणे.

५. 'आनंददायी शनिवार' उपक्रम राबवणे.

६. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.

७. शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देणे तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईड सर्टिफिकेट देणे.

८. FLN अंतर्गत मातागटाच्या WhatsApp ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे.

९. महिनाअखेरीस मासिक पत्रके, उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे.

१०. 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाची मागणी करणे, तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरवून घेणे, व्यवस्थित ठेवणे, त्याची देखभाल करणे, नियमित हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे दररोज पोषण आहार शिजवून देणे, यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

११. प्रत्येक महिन्यातील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेअंतर्गत इंधन, भाजीपाला व पूरक आहार देयक यांची ऑनलाइन तपासणी करणे व प्राप्त अनुदानातून देयक अदा करणे.

१२. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांतर्गत रोजकीर्द, खतावणी, दरपत्रक निविदा फाईल, व्हाउचर (पावती) फाईल, साठा नोंदवही व इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड तयार करणे.

१३. शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे.

१४. शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून DDO2 कडे पाठवणे.

१५. विविध संस्था/NGO यांच्याशी झालेल्या करारानुसार राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१६. UDISE + पोर्टल-विद्यार्थी IMPORT, Left with TC करणे, आधार, अपार, भौतिक सुविधा इ. माहिती अपडेट करणे.

१७. केंद्रशासन व राज्यशासन स्तरांवरून वेळोवेळी सूचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१८. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर या मासिकांमधील आवश्यक उपक्रम शाळेत राबवणे.

१९. शालेय स्तरावरील विविध समित्यांच्या बैठकांचे आयोजन करणे.

२०. शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणे.



महिना - जून २०२६

पहिला आठवडा :-

१. 'गुढीपाडवा, पट वाढवा' उपक्रम /पटनोंदणी करणे.

२. शालेय गणवेश खरेदीचे नियोजन करणे.

३. 'जागतिक पर्यावरण दिन' (५ जून) साजरा करणे.

४. UDISE + पोर्टलवर इयत्तानिहाय विद्यार्थी प्रमोशन करणे.

५. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश परीक्षा आयोजन करणे.

दुसरा आठवडा :-

१. 'गुढीपाडवा, पट वाढवा' उपक्रम /पटनोंदणी करणे.

२. शाळा सुरू करण्याविषयी आवश्यक ती पूर्वतयारी करणे. शाळा स्वच्छता, दवंडी, गृहभेटी, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, प्रवेशोत्सव नियोजन इत्यादी.

३. शाळेचा परिसर, शाळा स्वच्छतागृह, वर्गखोल्या व किचनशेड स्वच्छ करून घेणे.

तिसरा आठवडा :-

१. प्रवेशोत्सवाचे आयोजन करणे.

२. पाठ्यपुस्तके, गणवेश यांचे वाटप करणे.

३. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणे, आवश्यकतेनुसार तयारी करून घेणे, पूरक मार्गदर्शन करणे आणि मागील इयत्तेच्या महत्त्वाच्या घटकांची उजळणी करणे. / ब्रिज कोर्स

४. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी आवश्यक तयारी / सराव करणे.

५. UDISE + स्टुडंट पोर्टलवर इयत्ता पहिलीतील दाखल /शाळेत नवीन विद्यार्थी दाखल यांची नोंदणी करणे, माहिती अद्ययावत करणे.

६. महाराणा प्रतापसिंह जयंती (१७ जून) साजरी करणे.

७. 'जागतिक योग दिन' (२१ जून) साजरा करणे.

८. 'उल्लास नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत असाक्षरांची नोंदणी करणे.

९. इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षांचे आयोजन करणे.

चौथा आठवडा :-

१. 'गुढीपाडवा, पट वाढवा' उपक्रम/पटनोंदणी करणे.

२. प्रवेशोत्सवाचे आयोजन करणे.

३. पाठ्यपुस्तके, गणवेश यांचे वाटप करणे.

४. 'निपुण महाराष्ट्र अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी आवश्यक तयारी करणे.

५. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणे, आवश्यकतेनुसार तयारी करून घेणे, पूरक मार्गदर्शन करणे आणि मागील इयत्तेच्या महत्त्वाच्या घटकांची उजळणी करणे. / ब्रिज कोर्स

६. UDISE + स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थी आधार Update करणे, अपार ID तयार करणे.

७. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती (२६ जून) साजरी करणे.

८. 'उल्लास नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवकांची नियुक्ती करणे व स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे.

९. विद्यार्थ्यांचे वजन व उंची यांची नोंद घेणे.

१०. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे प्राणायाम/योग, कृती व खेळ यांवर आधारित शिक्षण इत्यादी.



महिना - जुलै २०२६

पहिला आठवडा :-

१. 'निपुण महाराष्ट्र अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी आवश्यक तयारी / सराव करणे. / ब्रिज कोर्स

२. शालार्थ-वार्षिक वेतनवाढ निश्चित करून DDO2 लॉगइनला पाठवणे.

३. 'एक पेड़ माँ के नाम' वृक्षारोपण उपक्रम आयोजन करणे.

४. वसंतराव नाईक जयंती (१ जुलै) साजरी करणे.

५. मोफत पाठ्यपुस्तके वाटप कमी/जास्तीचा आढावा घेणे.

६. शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेचे आयोजन करणे.

७. FLN विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चित करणे.

८. मातापालक मेळावा आयोजित करणे.

९. श्री संत गुलाबराव महाराज जयंती (६ जुलै) साजरी करणे.

दुसरा आठवडा :-

१. 'निपुण महाराष्ट्र अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी आवश्यक तयारी / सराव करणे. / ब्रिज कोर्स

२. शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहिमेचे आयोजन करणे.

३. तंबाखूमुक्त शाळा फलक / सूचनापत्रके / फोटो जतन व अपलोड करणे.

४. विद्यांजली २.० पोर्टलबाबत कार्यवाही करणे.

५. 'उल्लास - नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत 'वारी साक्षरतेची' या उपक्रमाचे आयोजन करणे.

६. इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा/NMMS परीक्षा इत्यादी स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थी निवड करणे.

७. परसबाग निर्मिती व संवर्धन करणे.

८. उपस्थिती भत्ता / सा. फु. द. पा. लाभार्थी निश्चित करणे.

तिसरा आठवडा :-

१. इयत्ता अकरावीचे वर्ग नियमितपणे सुरू करणे.

२. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरणे.

३. पायाभूत चाचणीसाठी (PAT - 1) विद्यार्थ्यांची आवश्यक तयारी करून घेणे.

४. 'एक पेड़ माँ के नाम' वृक्षारोपण उपक्रम आयोजन करणे.

५. 'राष्ट्र प्रथम' उपक्रमांतर्गत आत्मरक्षा प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, सैनिकी शिक्षण, शैक्षणिक प्रबोधन.

६. विविध योजनांची माहिती देणे सावित्रीबाई फुले विद्यार्थी बालसंगोपन योजना, जातीचे दाखले, एसटी पास, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना इत्यादी.

चौथा आठवडा :-

१. FLN अंतर्गत शिक्षण सप्ताह (दि. २३ जुलै ते ३१ जुलै) साजरा करणे.

२. विद्यार्थी अपार ID तयार करणे.

३. पायाभूत चाचणीचे (PAT 1) आयोजन करणे.

४. इयत्ता दहावीच्या व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र यांचे वाटप करणे.

५. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती (२३ जुलै) साजरी करणे.

६. परसबाग निर्मिती व संवर्धन करणे.

७. आयडॉल शिक्षक राज्य स्तर परिसंवाद, सीएसआर, लोकसहभाग.

८. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे कृषी साक्षरता व खेळ यांवर आधारित शिक्षण, चित्रकला इत्यादी.




महिना - ऑगस्ट २०२६

पहिला आठवडा :-

१. इको क्लब स्थापन करणे.

२. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (१ ऑगस्ट) साजरी करणे.

३. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती (३ ऑगस्ट) साजरी करणे.

४. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (RIMC) प्रवेश परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून आवेदनपत्र भरून घेणे.

५. पायाभूत चाचणीच्या (PAT-1) उत्तरपत्रिका तपासणे.

६. इयत्ता आठवी NMMS आवेदनपत्र भरून घेणे.

७. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत याचा सराव करून घेणे.

८. विविध योजनांची माहिती देणे सावित्रीबाई फुले विद्यार्थी बालसंगोपन योजना, जातीचे दाखले, एसटी पास, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना इत्यादी.

दुसरा आठवडा :-

१. 'उल्लास - नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत सराव परीक्षेचे आयोजन करणे. ग्रामस्थ मेळावा आयोजन करणे.

२. 'हर घर तिरंगा' उपक्रम व 'मेरी माटी मेरा देश' यांसारखे उपक्रम राबवणे.

३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे व संदर्भित विद्यार्थी संदर्भसेवेसाठी / तपासणीसाठी पाठपुरावा करणे.

४. पायाभूत चाचणी (PAT 1) विद्यार्थी गुणांची नोंद VSK पोर्टलवर करणे. पालकसभा घेऊन उत्तरपत्रिका दाखवणे व संपादणुकीनुसार, आवश्यकतेनुसार विद्यार्थी तयारी करून घेणे.

५. भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा.

६. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत याचा सराव करून घेणे.

तिसरा आठवडा :-

१. 'स्वातंत्र्यदिन' (१५ ऑगस्ट) साजरा करणे. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत करणे.

२. शिक्षक राज्यस्तरीय नवोपक्रम नोंद व अहवाल तयार करणे.

३. Inspire Award साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नामांकन भरणे.

४. 'सद्भावना दिवस' (२० ऑगस्ट) शपथ घेणे.

५. 'राष्ट्र प्रथम' उपक्रमांतर्गत आत्मरक्षा प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, सैनिकी शिक्षण, शैक्षणिक प्रबोधन.

६. 'एक पेड़ माँ के नाम' वृक्षारोपण उपक्रम आयोजन करणे.

चौथा आठवडा :-

१. आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १ (इयत्ता पहिली ते आठवी) / घटक चाचणी क्र. १ (इयत्ता नववी ते बारावी) चे आयोजन करणे.

२. 'उल्लास नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत सराव चाचणीचे आयोजन करणे.

३. 'राष्ट्रीय क्रीडा दिन' (२९ ऑगस्ट) साजरा करणे.

४. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, लेजीम इत्यादी.




महिना - सप्टेंबर २०२६

पहिला आठवडा :-

१. आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १ (इयत्ता पहिली ते आठवी) / घटक चाचणी क्र. १ (इयत्ता नववी ते बारावी) मधील संपादणुकीनुसार, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करणे.

२. Hackathon प्रशिक्षण विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन नोंदणी करणे.

३. 'शिक्षकदिन' (५ सप्टेंबर) साजरा करणे.

४. राजे उमाजी नाईक जयंती (७ सप्टेंबर) साजरी करणे.

५. पोषण पंधरवडा (१ ते १५ सप्टेंबर) आयोजन करणे.

६. साक्षरता सप्ताहाचे आयोजन करणे.

७. वीरगाथा कार्यक्रमात सहभाग घेणे.

दुसरा आठवडा :-

१. UDISE + DCF प्रपत्र डाऊनलोड करणे, ऑनलाइन माहिती भरणे.

२. UDISE + वर शाळेची माहिती तपासून घेणे.

३. इयत्ता दहावी व बारावी राज्य मंडळ परीक्षांचे आवेदनपत्र भरून घेणे.

४. पोषण पंधरवडा (१ ते १५ सप्टेंबर) आयोजन करणे.

५. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन (१३ सप्टेंबर) साजरा करणे.

६. 'राष्ट्र प्रथम' उपक्रमांतर्गत आत्मरक्षा प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, सैनिकी शिक्षण, शैक्षणिक प्रबोधन.

७. 'एक पेड़ माँ के नाम' वृक्षारोपण उपक्रम आयोजन करणे.

तिसरा आठवडा :-

१. UDISE + पोर्टलवर विद्यार्थी, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरणे व शाळांचा ड्रॉप बॉक्स शून्य करणे.

२. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती (१७ सप्टेंबर) साजरी करणे.

३. परसबाग स्पर्धेसाठी आवश्यक पूर्वतयारी करणे.

४. शालेय बँड स्पर्धेमध्ये सहभागी होणे.

५. 'उल्लास नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत चाचणीचे आयोजन करणे.

६. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेणे.

चौथा आठवडा :-

१. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती (२५ सप्टेंबर) अंत्योदय दिवस साजरा करणे.

२. UDISE + पोर्टलवर शाळा, वि‌द्यार्थी, शिक्षक यांची माहिती अंतिम करणे व शाळांचा ड्रॉप बॉक्स शून्य करणे.

३. रंगोत्सव कार्यक्रमात सहभाग घेणे.

४. विद्यार्थ्यांचे वजन व उंची यांची नोंद घेणे.

५. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेणे.

६. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे संगणकाची ओळख, कला, शिल्पकला इत्यादी.




महिना - ऑक्टोबर २०२६

पहिला आठवडा :-

१. महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती (२ ऑक्टोबर) साजरी करणे.

२. 'स्वच्छता हीच सेवा' उपक्रम राबवणे.

३. 'अभिजात मराठी भाषा दिन' (३ ऑक्टोबर) साजरा करणे.

४. मराठी भाषा फाऊंडेशन अंतर्गत चाचणी क्र. १चे आयोजन करणे.

५. संचमान्यतेचा ड्राफ्ट तपासणे व आवश्यक दुरुस्ती करणे.

६. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (केंद्र स्तर)

७. मातापालक मेळावा आयोजन करणे.

दुसरा आठवडा :-

१. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शाळानोंदणी करून विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरणे.

२. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी (तालुका स्तर) तयारी करून घेणे.

३. विद्यांजली २.० पोर्टलबाबत कार्यवाही करणे.

४. 'उल्लास - नवभारत साक्षरता' कार्यक्रम टप्पा-२, असाक्षर नोंदणी करणे.

तिसरा आठवडा :-

१. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती 'वाचन प्रेरणा दिन' (१५ ऑक्टोबर) साजरा करणे.

२. 'जागतिक हात धुवा' दिन (१५ ऑक्टोबर) साजरा करणे.

३. संकलित मूल्यमापन १ (इयत्ता पहिली ते आठवी) (PAT-2) / प्रथम सत्र (इयत्ता नववी ते बारावी) तयारी / सराव करणे.

४. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (तालुका स्तर)

५. शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांसाठी स्पर्धा (जिल्हा स्तर).

चौथा आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन १ (इयत्ता पहिली ते आठवी) (PAT-2) / प्रथम सत्र (इयत्ता नववी ते बारावी) चे आयोजन करणे.

२. महर्षी वाल्मिकी जयंती (२६ ऑक्टोबर) साजरी करणे.

३. उत्तरपत्रिका तपासणे, PAT-2 मधील गुणांची नोंद VSK पोर्टलवर करणे.

४. विज्ञान प्रदर्शन सहभागासाठी पूर्वतयारी.

५. विद्यार्थी पट पडताळणी करणे.

६. इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिवस' (३१ ऑक्टोबर) साजरा करणे.

७. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व 'राष्ट्रीय एकता दिवस' (३१ ऑक्टोबर) साजरा करणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे वाचन संस्कृती, कृषी साक्षरता, रांगोळी इत्यादी.




महिना - नोव्हेंबर २०२६

पहिला आठवडा :-

१. UDISE + वर आवश्यकतेनुसार विद्यार्थी माहिती समाविष्ट करणे आणि दुरुस्ती फॉर्म सादर करणे.

२. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे.

दुसरा आठवडा :-

१. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सत्र १ (इयत्ता पहिली ते आठवी) / प्रथम सत्र (इयत्ता नववी ते बारावी) चे कामकाज पूर्ण करणे.

२. 'राष्ट्रीय शिक्षण दिन' (११ नोव्हेंबर) साजरा करणे.

३. पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (१४ नोव्हेंबर) साजरी करणे.

४. 'माजी विद्यार्थी संघ' उपक्रमांतर्गत मेळावा आयोजन करणे.

तिसरा आठवडा :-

१. बिरसा मुंडा जयंती (१५ नोव्हेंबर) साजरी करणे.

२. इंदिरा गांधी जयंती व 'राष्ट्रीय एकात्मता दिन' (१९ नोव्हेंबर) साजरा करणे.

३. PAT-2 मधील विद्यार्थी गुणांची नोंद VSK पोर्टलवर करणे.

४. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी (जिल्हा स्तर) तयारी करून घेणे.

५. 'माजी विद्यार्थी संघ' उपक्रमांतर्गत मेळावा आयोजन करणे.

६. विज्ञान प्रदर्शनात सहभागासाठी पूर्वतयारी करणे.

७. शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांसाठी स्पर्धा (विभाग स्तर).

चौथा आठवडा :-

१. पालक सभा घेऊन संकलित मूल्यमापन १ (PAT-2) /प्रथम सत्र उत्तरपत्रिका दाखवणे व संपादणुकीनुसार आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करणे.

२. 'समाजकल्याण शिष्यवृत्ती' योजनेअंतर्गत लाभार्थी माहिती NSP पोर्टलवर भरणे.

३. 'संविधान दिन' (२६ नोव्हेंबर) साजरा करणे.

४. तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणे.

५. नवोदय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे.

६. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे. (जिल्हा स्तर)

७. 'माजी विद्यार्थी संघ' उपक्रमांतर्गत मेळावा आयोजन करणे.

८. आयडॉल शिक्षक राज्य स्तर परिसंवाद, सीएसआर, लोकसहभाग.

९. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे सांविधानिक मूल्यांची रुजवणूक, मेंदी इत्यादी.




महिना - डिसेंबर २०२६

पहिला आठवडा :-

१. वार्षिक स्नेहसंमेलन तयारी व शैक्षणिक सहल (क्षेत्रभेट गड /किल्ले, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, संग्रहालये इत्यादी) नियोजन करणे.

२. 'राष्ट्रीय जंतनाशक दिवस' (४ डिसेंबर) साजरा करणे.

३. पाककृती स्पर्धेत सहभागी होणे.

४. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (जिल्हा स्तर)

५. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (RIMC) प्रवेश परीक्षेचे आयोजन करणे.

६. शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांसाठी स्पर्धा (राज्य स्तर).

दुसरा आठवडा :-

१. जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणे.

२. संत संताजी जगनाडे महाराज जयंती (८ डिसेंबर) साजरी करणे.

३. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

४. इयत्ता दहावी व बारावी राज्य मंडळ परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

५. वार्षिक स्नेहसंमेलन तयारी व शैक्षणिक सहल (क्षेत्रभेट-गड /किल्ले, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, संग्रहालये इत्यादी) नियोजन करणे.

तिसरा आठवडा :-

१. Inspire Award साठी प्रकल्प सादर करणे. Hackathon मध्ये सहभागी होणे.

२. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (विभाग स्तर)

३. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे.

४. शैक्षणिक सहल (क्षेत्रभेट-गड / किल्ले, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, संग्रहालये इत्यादी) आयोजन करणे.

५. विद्यार्थ्यांचे वजन व उंची यांची नोंद घेणे.

६. इयत्ता आठवी NMMS परीक्षेचे आयोजन करणे.

चौथा आठवडा :-

१. 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमासाठी नोंदणी करणे.

२. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे.

३. अटलबिहारी वाजपेयी जयंती (२५ डिसेंबर) साजरी करणे.

४. 'वीर बाल दिवस' (२६ डिसेंबर) साजरा करणे.

५. डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती (२७ डिसेंबर) साजरी करणे.

६. 'मराठी भाषा फाऊंडेशन' अंतर्गत चाचणीचे आयोजन करणे.

७. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे.

८. शैक्षणिक सहल (क्षेत्रभेट- गड / किल्ले, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, संग्रहालये इत्यादी) आयोजन करणे.

९. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे क्षेत्रभेट, यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती इत्यादी.
 



महिना - जानेवारी २०२७

पहिला आठवडा :-

१. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

२. इयत्ता दहावी व बारावी राज्य मंडळ परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

३. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती- 'बालिका दिन' (३ जानेवारी) साजरा करणे.

४. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे.

५. शैक्षणिक सहल (क्षेत्रभेट गड किल्ले, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, संग्रहालये इत्यादी) आयोजन करणे.

६. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (राज्य स्तर)

७. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचा सराव करून घेणे.

८. मातापालक मेळावा आयोजित करणे.

दुसरा आठवडा :-

१. विद्यांजली २.० पोर्टलबाबत कार्यवाही करणे.

२. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा SQAAF स्वयंमूल्यांकन /बाह्यमूल्यांकन करणे.

३. राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती (१२ जानेवारी) साजरी करणे.

४. स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) साजरी करणे.

५. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे.

६. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. (राज्य स्तर)

७. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतींचा सराव करून घेणे.

तिसरा आठवडा :-

१. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

२. इयत्ता दहावी व बारावी राज्य मंडळ परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून आवश्यकतेनुसार पूरक मार्गदर्शन करणे.

३. नवोदय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे.

४. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतींचा सराव करून घेणे.

चौथा आठवडा :-

१. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) साजरी करणे.

२. बाळासाहेब ठाकरे जयंती (२३ जानेवारी) साजरी करणे.

३. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त (२५ जानेवारी) मतदान जनजागृती उपक्रम, विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र व वेगवेगळ्या स्पर्धा घेणे.

४. 'प्रजासत्ताक दिन' (२६ जानेवारी) साजरा करणे, देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती करणे.

५. इयत्ता बारावी प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षांचे आयोजन करणे.

६. बालभारती वर्धापन दिनानिमित्त 'बालभारती गीत' ऐकवणे.

७. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

बालभारती गीत

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे २१व्या शतकातील कौशल्ये, पारंपरिक खेळांचा परिचय, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू इत्यादी.




महिना - फेब्रुवारी २०२७

पहिला आठवडा :-

१. विविध स्पर्धापरीक्षांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणे.

२. इयत्ता दहावी प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षांचे आयोजन करणे.

३. आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. २/घटक चाचणी क्र. २ चे आयोजन करणे.

४. इयत्ता दहावीच्या व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे.

दुसरा आठवडा :-

१. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करणे.

२. इयत्ता बारावीच्या राज्य मंडळ परीक्षेचे आयोजन करणे.

३. इयत्ता दहावीच्या व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे.

तिसरा आठवडा :-

१. इयत्ता दहावीच्या राज्य मंडळ परीक्षेचे आयोजन करणे.

२. संत सेवालाल महाराज जयंती (१५ फेब्रुवारी) साजरी करणे.

३. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी) साजरी करणे.

४. बाळशास्त्री जांभेकर जयंती (२० फेब्रुवारी) साजरी करणे.

५. संत रविदास महाराज जयंती (माघ पौर्णिमा या तिथीनुसार) साजरी करणे.

चौथा आठवडा :-

१. आकारिक मूल्यमापन चाचणी २ / घटक चाचणी क्र. २ मधील संपादणुकीनुसार, विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करणे.

२. संत गाडगेबाबा जयंती (२३ फेब्रुवारी) साजरी करणे.

३. 'मराठी भाषा गौरव दिन' (२७ फेब्रुवारी) साजरा करणे.

४. 'राष्ट्रीय विज्ञान दिन' (२८ फेब्रुवारी) साजरा करणे.

५. आयडॉल शिक्षक राज्य स्तर परिसंवाद, सीएसआर, लोकसहभाग.

६. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे स्थानिक कलांचा व संस्कृतीचा परिचय, वाचन संस्कृती इत्यादी.




महिना - मार्च २०२७

पहिला आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन २ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षा आवश्यक तयारी करणे.

२. 'उल्लास - नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन करणे.

दुसरा आठवडा :-

१. पटनोंदणी कुटुंब सर्वेक्षण करणे.

२. 'जागतिक महिला दिन' (८ मार्च) साजरा करणे.

३. यशवंतराव चव्हाण जयंती (१२ मार्च) साजरी करणे.

तिसरा आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन-२ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे/सराव घेणे.

२. विद्यार्थ्यांचे वजन व उंची यांची नोंद घेणे.

चौथा आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन-२ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे/सराव घेणे.

२. UDISE + सर्टिफिकेट तयार करून डाऊनलोड करणे.

३. 'शहीद दिन' (२३ मार्च).

४. 'मराठी भाषा फाऊंडेशन' अंतर्गत चाचणीचे आयोजन करणे.

५. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

'आनंददायी शनिवार' अंतर्गत उपक्रम राबवणे २१व्या शतकातील कौशल्ये, वाचन संस्कृती इत्यादी.




महिना - एप्रिल २०२७

पहिला आठवडा :-

१. 'गुढीपाडवा, पट वाढवा' उपक्रम राबवणे.

२. दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना शाळेत दाखल करणे.

३. संकलित मूल्यमापन-२ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे/सराव घेणे.

४. शाळेतील शेवटच्या इयत्तेच्या पुढील इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसाठी शाळांची जोडणी करणे.

५. मातापालक मेळावा आयोजित करणे.

दुसरा आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन २ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षा आयोजन करणे (इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा).

२. विद्यांजली २.० पोर्टलबाबत कार्यवाही करणे.

३. 'उल्लास - नवभारत साक्षरता' कार्यक्रमांतर्गत असाक्षरांचा शोध घेणे व माहिती ऑनलाइन भरणे.

४. महात्मा जोतिबा फुले जयंती (११ एप्रिल) साजरी करणे.

५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) साजरी करणे.

६. सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवेदनपत्र भरणे.

तिसरा आठवडा :-

१. संकलित मूल्यमापन २ (PAT-3) / द्वितीय सत्र परीक्षा आयोजन करणे. (इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा)

२. PAT-3 मधील गुणांची VSK पोर्टलवर नोंद करणे.

३. इयत्ता दहावीच्या व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करणे.

चौथा आठवडा :-

१. PAT-3 मधील गुणांची VSK पोर्टलवर नोंद करणे.

२. सत्र २ चे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पूर्ण करणे.

३. वार्षिक निकालपत्रक तयार करणे.

४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती (३० एप्रिल) साजरी करणे.

५. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

६. इयत्ता दहावीच्या व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करणे.




महिना - मे २०२७

१. 'महाराष्ट्र दिन' / 'कामगार दिन' (१ मे) साजरा करणे.

२. 'गुढीपाडवा, पट वाढवा' उपक्रम राबवणे.

३. वार्षिक निकाल जाहीर करणे व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करणे.

४. इयत्ता पाचवी व आठवीमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेसाठी तयारी करून घेणे.

५. इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र वितरण करणे.

६. इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया विद्यार्थी व पालक यांचे उद्बोधन.

७. महात्मा बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) तिथीनुसार) साजरी करणे.

८. छत्रपती संभाजी महाराज जयंती (१४ मे) साजरी करणे.

९. 'भारतीय भाषा' समर कॅम्पचे आयोजन करणे.

१०. शाळा साहित्याची निगा व दुरुस्ती.

११. 'दशहतवाद व हिंसाचार विरोधी दिवस' (२१ मे).

१२. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती (२५ मे) साजरी करणे.

१३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (३१ मे) साजरी करणे.



सौजन्य :- माननीय शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, शिक्षण संचालनालय (प्राथमिक), शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), Designing, Typesetting and Printing by Runa Graphics, Pune

Post a Comment

0 Comments