नव्या युगाचे गाणे-कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 12, कविता व MCQ स्वाध्याय

  

नव्या युगाचे गाणे-कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती  - पृष्ठ क्र 12, कविता व MCQ स्वाध्याय

नव्या युगाचे गाणे-कविता- कवी वि भा नेमाडे - या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,

कवितेचा अर्थ-

कवी म्हणतात, वातावरणातील अतिशय सूक्ष्म अशा कणांना देखील म्हणजेच अणू- रेणूंनाही विज्ञानामुळे फार महत्त्व आले आहे एका जागी न थांबणारे हे अणू-रेणू आपल्यालाही 'पुढे चला' हा संदेश देत आहेत विज्ञानामुळे अज्ञान दूर होऊन सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे त्यामुळे जीवनात क्रांती घडून आली आहे आताचे युग हे विज्ञानयुग आहे-हेच नवीन युग आहे त्याचा दिव्य प्रकाश चोहीकडे पसरला आहे आता तर विज्ञानामुळे आम्ही शून्यातून विश्व निर्माण करु शकतो अनेक अनुत्तरीत प्रश्न या विज्ञानामुळे सुटले मनातील अशांतता शांत झाली रस्त्यातील अडथळे दूर झाले, त्यामुळे प्रगतीचा व उत्कर्षाचा मार्ग मोकळा झाला आत्मविश्वास वाढला, त्यामुळे मनातील कमजोर, दुबळे भाव नाहिसे झाले नवीन संजीवनी प्राप्त झाली उत्साह वाढला. निराशा संपली आशेची नवी किरणे दिसू लागली विज्ञानामुळे कदाचित मानवतेला धोका निर्माण झाला असेल पण विज्ञानाच्या संशोधनातून अमर असे जे शोध लागले, जाणिवा निर्माण झाल्या त्या पुष्पहाराप्रमाणे एकत्र गुंफून ठेवू आता विज्ञानाचा नवा सूर्य उगवला आहे, तेव्हा दुःख, शोक, दैन्य दूर सारु व उत्कर्षाचा झळाळणारा प्रकाश पाहू मुले, तरुण, वृद्ध सर्वांनाच विज्ञानामुळे जोश आला आहे मनात नवीन आशा पुलकीत झाल्या आहेत कारण सूक्ष्म अशा अणूरेणूतून ‘पुढे चला' हा ध्वनी- आवाज आला आहे

स्वाध्याय -

आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck

आमच्या  टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments