चला चला हो
एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान
।।धृ.।।
हिमालयाची
हिमशिखरे ती । भारतभूच्या शिरी डोलती।
गंगा, यमुना आणि गोमती
। घालिती पवित्र स्नान ।।१।।
इतिहास नवा हा
बलिदानाचा । शौर्याचा अन् पराक्रमाचा
समतेचा अन्
विश्वशांतिचा । जागवी राष्ट्राभिमान ।।२।।
शौर्याने जे
वीरचि लढले । रणांगणी ते पावन झाले ।
भारतभूचे स्वप्न
रंगले । चढवूनि उंच निशाण ।।३।।
कवितेचा अर्थ :-
(१) चला चला ................... पवित्र स्नान ॥१॥
अर्थ - चला आपण सर्व एकच गाणे गावू आणि त्यातून सांगू की आपला भारत देश किती महान आहे. उत्तरेला भारतभूमीच्या शीरावर हिमालयाची पांढरीशुभ्र शिखरे आहेत. गंगा, यमुना, गोमती यासारख्या अतिशय पवित्र नद्या ह्या जणू माझ्या भारत भूमीला पवित्र स्नानच घालत आहेत.
(२) इतिहास नवा .................. जागवी राष्ट्राभिमान ॥२॥
अर्थ - भारत भूमी
ही शूरांची भूमी आहे. देशासाठी हसतहसत बलीदान करणे ही भारतीयांची जुनीच परंपरा आहे.
आम्ही आमचे शौर्य आणि पराक्रम दाखवून समानतेचा व विश्वशांतिचा संदेश जगाला देवू
तसेच सर्वांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करू.
(३) शौर्याने जे .................. उंच निशाण ॥३॥
अर्थ - या भूमीचे शूर पुत्र जे या देशासाठी लढले, ज्यांना रणांगणावर वीरमरण प्राप्त झाले.ज्यांनी मायभूमीचे स्वप्न पूर्ण केले अशा महान वीरांना ध्वज उंचावून आपण सर्वजण अभिवादन करू या....
भारत देश महान- इयत्ता 8 वी- पृष्ठ क्र.1 चा video पाहू या
0 Comments