जय जय महाराष्ट्र माझा-इयत्ता 7 वी मराठी बालभारती-पृष्ठ क्र 1


जय जय महाराष्ट्र माझा-इयत्ता 7 वी मराठी बालभारती-पृष्ठ क्र 1 

जय जय महाराष्ट्र माझा

कवी व कविता परिचय : राजा  बढे (१९१२-१९७७) ___ मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ते संपादक, चित्रपट अभिनेते, गदय लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार व गायक म्हणूनही ओळखले जातात. 'माझिया माहेरा जा', 'हसले मनी चांदणे', 'क्रांतिमाला', 'मखमल' इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. 'गीतगोविंद', 'गाथासप्तशती', 'मेघदूत' इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध आहेत. 'जय जय महाराष्ट्र माझा' या स्फूर्ती गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी वर्णन केली आहे. महाराष्ट्राबाबतचा अभिमान या कवितेतून दिसून येतो.

 

जय जय महाराष्ट्र माझा- कविता

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ.।।

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।

 

भीति न आम्हां तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा

दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।२।।

 

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।।३।।

 

कवितेचा अर्थ.

(१) जय जय महाराष्ट्र .................. पाणी पाजा ॥१॥

अर्थ - माझा महाराष्ट्र थोर आहे. त्याचा सदैव जयजयकार असो अशी गर्जना महाराष्ट्रतील लोक करतात. या महाराष्ट्राच्या भूमीरूपी घागरीत रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रावती, गोदावरी या नया आपले पवित्र पाणी एकतेने भरत आहे. या थोर महाराष्ट्राचे सैन्य भेट उत्तरेकडे जावून तट्टांना यमुनेचे पाणी पाजणार. असा हा महाराष्ट्र माझा आहे व त्याचा मला अभिमान आहे.

(२) भीति न .................. महाराष्ट्र माझा ॥२॥

अर्थ - आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्यांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. गडगडणारे ढग आम्हाला घाबरवू शकत नाही. यांना उत्तर देण्यासाठी आमच्या जिभाच पुरेशा आहेत. अशीच शिकवण सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवराय यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्या शिकवणीच्या घोषणा दरीदरीतून घूमत आहेत. हा महाराष्ट्र माझा आहे.

(३) काळ्या छातीवरी .................. महाराष्ट्र माझा ॥३॥

अर्थ - या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहेत. त्यांच्या या काळ्या छातीवर महाराष्ट्राविषयी असलेल्या अभिमानाची लेणी कोरली आहेत. त्यांची मनगटे पोलादी आहेत. त्यामुळे ते जीवावरचा खेळखेळण्यास मागेपुढे पहात नाही. महाराष्ट्रील लोक दारिद्र्याच्या उन्हात शिजतात, पण कष्ट करून ते निढळाचा घाम गाळतात. भरपर कष्ट करतात. पिढ्यानपिढ्या इथे देशगौरवासाठी लोक झिजले आहेत. दिल्लीच्या सिंहासनाचीही शान राखणारा असा महाराष्ट्र आहे.

जय जय महाराष्ट्र माझा-इयत्ता 7 वी मराठी बालभारती-पृष्ठ क्र 1 वरील video पाहू या  video पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जय जय महाराष्ट्र माझा-इयत्ता 7 वी मराठी बालभारती-पृष्ठ क्र 1 वरील स्वाध्याय सोडवू या 


Post a Comment

1 Comments