बुलडाणा जिल्हा परिषद ही ZPFMS प्रणाली द्वारे थेट शिक्षक कर्मचारी खात्यांमध्ये वेतन जमा करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे

 


बुलडाणा जिल्हा परिषद ही ZPFMS प्रणाली द्वारे थेट शिक्षक कर्मचारी खात्यांमध्ये वेतन जमा  करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे

सोबतच शिक्षकांच्या सोईसाठी Mobile Application च्या माध्यमातून वेतनाचा तपशिल (Pay - Slip) देखील उपलब्ध देणारा बुलढाणा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.

जि.प.बुलढाणा अंतर्गत शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे जुलै-2022 चे वेतन हे बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत संचलित ZPFMS या प्रणाली मार्फत आज दिनांक - 08.08.2022 रोजी, सकाळी - 11.30 वाजता थेट मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब यांच्या जिल्हा खात्यातून शिक्षकांच्या खात्यामध्ये त्यांचे निव्वळ वेतन आणि गट शिक्षणाधिकारी /हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खात्यामध्ये गैर शासकीय कपात रक्कम वर्ग करण्याची (Final Approval) प्रक्रिया या स्तरावरून पूर्ण करण्यात आलेली आहे. सोबतच मागील अनेक महिन्यांपासून प्रस्तावित आणि शिक्षक बांधवांना प्रतीक्षेत असलेला "Online Mobile Pay Slip" या महत्वाकांक्षी उपक्रमाचे देखील अनावरण या सोबतच करण्यात आले आहे. वरील दोन्ही उपक्रमाची एकाच वेळी अंमलबजावणी करणारा आपला बुलढाणा जिल्हा हा राज्यात प्रथम ठरला आहे.

ZPFMS प्रणाली मार्फत जिल्हा परिषदेतील एकूण 5554- प्राथमिक शिक्षक, 523- माध्यमिक शिक्षक व 40- केंद्रप्रमुखांचे निव्वळ वेतन आणि 1314- शाळांच्या मुख्याध्यापक खात्यामध्ये गैर शासकीय रकमांची हस्तांतरण करण्यात यश आले आहे. तथापि, ZPFMS प्रणाली ही Bank Of Maharashtra मार्फत संचालित असल्याने प्रत्यक्ष लाभार्थी खात्यामध्ये वेतन जमा होण्यास काही तासांचा अवधी अपेक्षित आहे याची सर्व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यावी. सर्वांनी आपणास सोयीस्कर अशा माध्यमातून (Online Net Banking/Yono/UPI etc ) स्वतःचे वेतन अचूक जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. सदरील वेतन हे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदणी असलेल्या देयक तथा बँक खाते विवरणनुसार वर्ग करण्यात आले आहे. तथापि, या संदर्भाने काही त्रुटी अथवा तफावत असल्यास आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यानिशी कर्मचाऱ्यांचा लेखी अर्ज व मुख्याध्यापक पत्रासह तात्काळ गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन शाखेशी संपर्क करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. म्हणूनच बुलडाणा जिल्हा परिषद ही ZPFMS प्रणाली द्वारे थेट शिक्षक कर्मचारी खात्यांमध्ये वेतन जमा  करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे

ZPFMS प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे वेतन CMP ने करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची निर्मिती व अंमलबजावणी यशस्वीपणे होण्यासाठी- जि.प.बुलडाणा च्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मा.भाग्यश्री विसपुते मॅडम (भा.प्र.से) यांची प्रेरणा...मा.विनोदजी गायकवाड साहेब, मुख्य लेखा व वित्त आधिकारी यांचे अमूल्य मार्गदर्शन..मा.किशोरजी पागोरे साहेब, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) व मा. प्रकाश मुकुंद साहेब, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), यांचे नियोजन..मा.प्रकाश जी राठोड साहेब, उपमुख्य लेखा व वित्त आधिकारी, श्री.अनिल कऱ्हाडे साहेब, लेखाधिकारी वित्त विभाग श्री.चव्हाण साहेब, लेखाधिकारी वित्त विभाग, श्री.उमेश जैन साहेब, प्र.उपशिक्षणाधिकारी, सौ.वृंदा कुळकर्णी मॅडम प्र.उपशिक्षणाधिकारी, श्री संतोष औटी साहेब सहाय्यक लेखाधिकारी, श्री.संतोष शेळके साहेब, कनिष्ठ लेखाधिकारी,श्री.काळेसाहेब, ऑडीटर शिक्षण विभाग,श्री.पवन वाघमारे साहेब ऑडीटर वित्त विभाग,श्री.राणे साहेब, कॅशियर वित्त विभाग, श्री.सचिन झिने साहेब ZPFMS Technical Engineer आदींचे सहकार्य लाभले. तसेच श्री. संतोष पिंपळे सर (शालार्थ जिल्हा समन्वयक जालना ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील उपक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू श्री.संदीप जढाळ, शालार्थ जिल्हा समन्वयक बुलडाणा यांनी यशस्वीपणे पार पाडली. सदरील शिक्षक आर्थिक हिताच्या उपक्रमाच्या निर्मिती ते अंमलबजावणी पर्यतच्या कार्यकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभलेल्या जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण व वित्त विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ता. आस्थापना, MIS coordinator, तंत्रस्नेही शिक्षक बांधव आणि सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचे जिल्हा प्रशासन व मा. किशोरजी पागोरे साहेब, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांचेतर्फे मन:स्वी अभिनंदन केले आहे.

Mobile Application च्या माध्यमातून वेतनाचा तपशिल (Pay - Slip) पाहण्यासाठी खालील app download करा

Mobile Application download करण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे

Post a Comment

0 Comments