COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास 50
लक्ष विमा संरक्षण
दिनांक 1 ऑक्टोबर 2020 नंतर महाराष्ट्रातील कर्मचारी
जर कर्तव्यावर असताना COVID बाधित झाला असेल आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला
असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या वारसाला शासनाकडून 50 लक्ष रुपये सानुग्रह अनुदान
देण्यासंदर्भात शासन पत्र महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले आहे, या शासन
आदेशानुसार अशा कर्मचाऱ्याचा प्रस्ताव राज्य शासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कडे
आवश्यक त्या महत्वाच्या कागदपात्रांना जोडून सादर करायचा आहे त्यामध्ये कर्मचारी
दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी कर्तव्यावर हजर असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार
आहे कोविड मुळेच संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी
यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे मृत्यूचे प्रमाणपत्राची
प्रत, मुळ सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि इतर महत्वाचे पुरावे
सोबत जोडावेत अधिक माहितीसाठी संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करावा
COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास कोरोना झाल्यास 14 दिवसांची विशेष रजा
0 Comments