महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत website वर उपलब्ध झाले होते व ही परीक्षा दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी होणार होती मात्र आता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
कोरोना
विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती
प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली
असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून
देण्यासंदर्भात शासन निर्णय, क्रमांक सामान्य
प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही २०२१/प्र क्र६१ /कार्या-१२, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या
निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी,
२०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा -
२०२१ पुढे ढकलण्यात येत आहे आणि परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर
करण्यात येणार आहे
0 Comments