इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 9 ऑगस्ट रोजी

 

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 9 ऑगस्ट रोजी 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ८ वी ही दि २३-०५-२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत एका प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते तद्नंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती तथापि शासनपत्रानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ८ वी ही दि ०८-०८-२०२१ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु दि ०८-०८-२०२१ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ८ वी दि ०८-०८-२०२१ ऐवजी दि ०९-०८-२०२१ घेण्यात येणार आहे तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि २७-०७-२०२१ रोजी पासून संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिनांक ०९-०८-२०२१ रोजी परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यास मदत करावी

परीक्षेसंदर्भातील पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अगोदरच्या वर्षी झालेल्या इयत्ता 8 वी च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी येथे क्लिक करा 

अगोदरच्या वर्षी झालेल्या इयत्ता 5 वी च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments