
जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार 2020-21 आवेदन- संपूर्ण माहिती
सदर फॉर्म हा
दिनांक 12 ऑगष्ट 2021 ला सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत भरावा.
जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार 2020-21 आवेदन online google form द्वारे भरण्यासाठी येथे क्लिक करा
पुढील बाबीचे काळजीपूर्वक वाचन करावे सदर फॉर्म जिल्हा
परिषद बुलडाणा च्या व्यवस्थापन मधील कार्यरत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तथा शिक्षकांनीच भरावा- यापूर्वी जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला असल्यास सदर फॉर्म भरू नये Link भरल्यानंतर जि.प.
बुलडाणा येथे दिनांक 17 ऑगष्ट 2021 वार मंगळवार रोजी मुलाखतीस उपस्थित राहत
असताना आपणास खालील बाबी सादर करणे अनिवार्य असेल- 2016-17 ते 2020-21 असे एकूण 5 वर्षाचे गोपनीय
अहवाल- संपूर्ण हयातीत आपणावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नसल्याबाबत 100/- रु च्या स्टॅॅम्प
पेपरवर प्रतिज्ञापत्र- 50 पृष्ठांच्या मर्यादेत आपल्या कामाशी संबधित Link
मधील मुद्द्यानिहाय प्रमाणपत्र / पुरावे /
कात्रणे / छायाचित्रे Spiral Binding केलेला प्रस्ताव - 03 प्रतीत- 5 वर्षाच्या गोपनीय अहवालाच्या मूळप्रती,
2020-21 मध्ये 100% वर्ग प्रगत असल्याबाबतचे गटशिक्षणाधिकारी
यांचे प्रमाणपत्र, खातेचौकशी सुरु
नसल्याबाबतचे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र, पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र हे अभिलेखे 1 मूळ प्रत व 2 साक्षांकित सत्यप्रती सोबत आणाव्यात- जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतूद
दिनांक 04 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली
आहे याची नोंद घ्यावी- सर्वांनी फॉर्म मराठीमध्ये भरावा अंक इंग्रजी
मध्ये टाकावेत- हा पुरस्कार
केवळ जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत
शिक्षकांना/ मुख्याध्यापकांना/ केंद्रप्रमुखांना दिला जातो
आपण ह्या वरील बाबी वाचल्या असतील तरच पुढील form वरील मुद्दे भरण्यास सुरुवात करायला
हवी-
1- Email address ---लिहिणे आवश्यक आहे
2- आपला तालुका नोंदवावा
3- संबोधन श्री/श्रीमती/सौ/कुमारी/Other: आपले पूर्ण नाव -प्रथम
नाव, मधले नाव, आडनाव-लिहावे
4- मोबाईल क्रमांक – लिहावा
5- पदनाम – निवडावे
6-शाळेचे नाव उदा-जि.प. मराठी उच्च
प्राथमिक शाळा---गावाचे नाव लिहावे
7- आपण शिकवीत असलेली इयत्ता / वर्गशिक्षक –निवडावे
8- शिक्षक संवर्ग- निवडावा- केंद्रप्रमुख यांनी प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ते 8 हे निवडावे/ प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ते 8/ माध्यमिक शिक्षक इयत्ता 9 ते 12
9- सेवेत नेमणूक दिनांक. प्रथम नेमणूक दिनांक- दिलेल्या दिनदर्शिकेतून निवडा
10- आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा- पदवी/ पदव्युत्तर /पदवी/ एमफील/ पीएचडी
11- पुरस्कार प्राप्त शोध निबंध आहे काय- तालुका स्तर/ जिल्हा स्तर/ राज्य-राष्ट्रीय
स्तर/ यापैकी नाही
12- वृत्तपत्रात प्रकाशित लेख-बातमी नव्हे- संख्या – येथे आपले वर्तमानपत्र/ मासिक/ जर्नल्समध्ये प्रकाशित
एकूण लेखांची संख्या नमूद करावी
13- शिकवीत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना कला
/ विज्ञान / स्काऊट गाईड / वक्तृत्व या क्षेत्रातील पुरस्कार मिळाला आहे काय- होय असल्यास - तालुका स्तर/जिल्हा स्तर/राज्य-राष्ट्रीय
स्तर/ किंवा नाही असल्यास - यापैकी नाही
14- शिक्षकाच्या शैक्षणिक / सामाजिक / सांस्कृतिक
कार्यासाठी शासन किंवा शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार- होय असल्यास - तालुका स्तर/जिल्हा स्तर/राज्य-राष्ट्रीय
स्तर/ किंवा नाही असल्यास- यापैकी नाही
15- अल्पबचत / कुटुंब कल्याण / जनगणना / पल्स पोलिओ
इ. राष्ट्रीय कार्यातील पुरस्कार- होय असल्यास - तालुका स्तर/जिल्हा स्तर/राज्य-राष्ट्रीय स्तर/ किंवा नाही असल्यास - यापैकी नाही
16- शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून
मिळवलेले योगदान- 10 ते 50 हजार/ 51 हजार ते 1लाख/ 1 लाखापेक्षा
जास्त/ किंवा यापैकी नाही
17- ग्रंथलेखन - प्रतीथयश प्रकाशनाने प्रकाशित
केलेली ग्रंथसंख्या/ पुस्तक संख्या- isbn
नंबर असलेले पुस्तक प्रकाशित असावे- अशी किती पुस्तके प्रकाशित आहेत त्यांची
संख्या नमूद करावी
18-पायाभूत चाचणीतील वर्गाची सरासरी श्रेणी-70% पेक्षा कमी/ 70% ते 80%/ 81% ते 90% / 91% ते 100%
19- विद्यार्थ्यांना मिळालेले क्रीडा पुरस्कार- आपण नोकरीला लागल्यापासून आतापर्यंत आपल्या
मार्गदर्शनाखाली आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा पुरस्कार किंवा बक्षीस मिळाले असेल तर
ते नमूद करावे - जिल्हा स्तर/राज्य स्तर/राष्ट्रीय स्तर/ नसेल तर - यापैकी नाही
20- शिष्यवृत्ती / नवोदय / प्रज्ञाशोध परीक्षा / NTS
/ NMMS बाबत निकाल- आपण नोकरीला लागल्यापासून आतापर्यंत आपल्या
मार्गदर्शनाखाली आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळाले असेल तर
त्याचा निकाल आपल्याजवळ असावा व त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण
नमूद करावे- 40% ते 60%/61% ते 80%/81% ते 100%/ निकाल उपलब्ध नसेल तर यापैकी नाही
21- राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेबाबत
स्वत: नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य- आपण या मुद्द्या अंतर्गत कार्य केलेले असेल आणि आपल्याकडे याचे पुरावे असतील
तरच होय नमूद करावे अन्यथा नाही नमूद करावे- ज्ञानरचनावाद/ABL /डिजिटल शाळा /ISO शाळा /वाचन प्रेरणा
22.शाळेतील मुलांनी वर्षभरात किती पुस्तके वाचली ? ग्रंथालय रजिस्टर आपल्याजवळ असावे त्यावरून आपल्या
वर्गातील एकूण मुलांपैकी सरासरी एका मुलाने दरमहा सरासरी किती पुस्तकांचे वाचन
केले ते नमूद करावे - 10 पेक्षा कमी/10 ते 20/20 पेक्षा जास्त
23- शाळेला Hand Wash Station आहे काय ? शाळेतील Hand Wash Station चा आपल्या जवळनळाच्या सर्व तोट्या दिसतील असा फोटो असावा / असावे- असल्यास होय अन्यथा नाही नमूद करावे – आपल्याला या मुद्द्या अंतर्गत- जागतिक
हाथ धुणे दिवस कधी असतो व किती मुलांसाठी 1 नळाची तोटी असते याची माहिती असावी
24- शिक्षण हक्क कायद्यानुसार 10 मुलभूत घटकांची पूर्तता- आपल्या शाळेत RTE कायद्या अंतर्गत शाळेला अत्यावश्यक सोयी सुविधांपैकी तुम्ही सद्या ज्या शाळेत नोकरीला आहात त्या शाळेत किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत- त्यांचे फोटो आपल्याजवळ असावेत - 5 पेक्षा कमी घटक/5 घटक/7 घटक/10 घटक
25- इतर कार्य – या व्यतिरिक्त आपले काही नाविन्यपूर्ण कार्य असेल ते या
शेवटच्या मुद्द्यात नमूद करावे
अत्यंत महत्वाचे- आपण या google form मध्ये जी काही माहिती नमूद करणार आहात त्या सर्व बाबींचे फोटो / प्रमाणपत्र / VIODEO / पुरावे दिनांक 17 ऑगष्ट 2021 वार मंगळवार रोजी- किंवा email वर दिल्या जाणाऱ्या सूचनेनुसार मुलाखतीच्या दिवशी सोबत असावेत- मुलाखत घेणाऱ्या अधिकारी महोदयांना मुलाखतीदरम्यान विचारलेली सर्व माहिती द्यावी-अर्ज अतिशय काळजी पूर्वक भरावा- मुलाखातीसाठी www.activityeducations.com परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा--
जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कार 2020-21 आवेदन online google form द्वारे भरण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments