शिक्षकांना जीवन शिक्षण मासिकात लेख प्रकाशित करण्याची सुवर्णसंधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार मुलांच्या प्रारंभिक भाषिक व गणितीय साक्षरता, कौशल्ये विकसित होण्यासाठी प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज नमूद करण्यात आली आहे. त्या अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या करिता 'निपुण भारत' अभियान राबविले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ( FLN ) विकसित व्हावे याकरिता या राष्ट्रीय मोहिमेचे राज्यस्तरावर आणि स्थानिक पातळीवर नियोजन करणे सुरु आहे. सदर अभियानाच्या अंमलबजावणी मध्ये शाळा, शिक्षा, पालक व समाज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यास्तव विद्यार्थी, शिक्षक, पालक, क्षेत्रीय अधिकारी यांच्यापर्यंत सदर "निपुण भारत मोहीम" व त्यामध्ये अंतर्भूत उपक्रम याबाबत जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे यांच्यामार्फत दर महिन्याला प्रकाशित केले जाणारे जीवन शिक्षण मासिकाकरिता पायाभूत भाषिक व गणितीय साक्षरता (FLN- Foundational Literacy and Numeracy) या विषयावर आधारित खालील मुद्द्यांवर लेख मागविण्यात येत आहेत.
पायाभूत भाषिक व
गणितीय साक्षरता : १. संकल्पना,गरज व महत्त्व
२. शाळा व शिक्षक
यांची भूमिका
३.पर्यवेक्षीय
यंत्रणेची भूमिका
४. नाविन्यपूर्ण
वर्गकृती व साहित्य
५. शालेय
वर्गवातावरण
६. पालक व समाज
भूमिका
७. शालेय
व्यवस्थापन समिती योगदान
८.पूर्वप्राथमिक
स्तरावरील विद्यार्थ्यांचा भाषिक विकास
९.पायाभूत भाषा व
गणितीय विकासामध्ये बहुभाषिकतेचे महत्त्व
१०.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची सदर उपक्रमातील शैक्षणिक भूमिका
११.FLN साठी मूल्यमापन प्रक्रिया
__ उपरोक्त विषयाशी संबंधित सर्व स्तरावर जाणीव
जागृती होण्याच्या दृष्टीने घोषवाक्य, कविता / चारोळी, इ. मागविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संबंधित विषयाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम शाळा स्तरावर
राबवत असतानाची छायाचित्रे पाठविण्यात यावीत.
लेखाची शब्दमर्यादा १०००-१२०० पर्यंत असावी व
लेख युनिकोड मध्ये टाईप केलेला असावा.
लेख गणित विभागाच्या mathsdept@maa.ac.in ईमेल वर
दि. ०५/०७/२०२१ पर्यंत पाठविण्यात यावेत. उपरोक्त विषयावरील लेख पाठविण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण तज्ञ, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या पर्यंत ही माहिती पोहचवावी आणि महाराष्ट्रातील शिक्षकांनी जीवन शिक्षण मासिकास जास्तीत जास्त लेख पाठवावेत.आणि स्वतःचा लेख, कविता, चारोळी, घोषवाक्य जीवन शिक्षण मासिकात प्रकाशित करण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
0 Comments