तंत्रस्नेही शिक्षकांना कायम मार्गदर्शन
करणारा फेसबुक समूह म्हणून “ टीचट्युबर्स ” सुपरिचित आहे. या समूहाकडून नेहमीच
चांगल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन
केले जाते. विशेषतः युट्युब व्हिडीओ संदभति समूहाकडून नेहमीच महाराष्ट्रातील
शिक्षक बांधवांना फेसबुक समूह आणि विविध ऑनलाईन कार्यशाळामधून तांत्रिक मार्गदर्शन
केले जात असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि. 18 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5:00 ते 7:00 या वेळेत मोबाईल फोटो एडिटिंग या विषयावर ऑनलाईन
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नांदेड येथील सुप्रसिद्ध टेक्निकल गुरू
श्री.श्याम कापसे हे या कार्यशाळेत महाराष्ट्रातील शिक्षकांना ऑनलाईन मार्गदर्शन
करणार आहेत. विशेष म्हणजे सदर कार्यशाळा के जी टू पी जी च्या शिक्षक व
प्राध्यापकांसाठी मोफत आहे.
दि. 18 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5:00 ते 7:00 या वेळेत मोबाईल
फोटो एडिटिंग या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील facebook लिंक वर क्लिक करा.
0 Comments