शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) शिष्यवृत्ती कोटा, आरक्षण, पात्रता गुण तसेच निवड प्रक्रिया -

 


शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2019-20 नुसार 

शिष्यवृत्ती कोटा, आरक्षण,  पात्रता गुण तसेच निवड प्रक्रिया - खालीलप्रमाणे होती..

 

1. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11,682 शिष्यवृत्ती कोटा M.H.R.D. नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.

2. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधीत संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

3. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगासाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे.

4.  सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.

5. पात्रता गुण : MAT SAT दोन्ही विषयात एकत्रित GEN, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC साठी ४०% गुण व SC, ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत.

6. प्रत्येक जिल्हयासाठीचा कोटा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

    1. प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण (General) संवर्गातील पात्र विद्यार्थांची निवड केली जाते.

   2.  त्यानंतर गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांचा त्या त्या (८)विशेष संवर्गातील विद्यार्थांच्या यादीत समावेश केला जातो.

   3. विशेष संवर्गातील यादी करताना त्या संवर्गातील सर्वसाधारण यादीमध्ये निवड झालेली विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही.

   4. प्रत्येकी संवर्गातील दिव्यंगत्वासाठी एकूण ४% आरक्षण देण्यात यावे (a),(b) व (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d),(e) या साठी १% आरक्षण प्रत्येक स्वतंत्रपणे देण्यात आले आहे.

          (a) Blindness and low vision : (BLV)

          (b) Deaf and hard of hearing : (DH)

          (c) Locomotor disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy : (LD)

         (d) Autism, intellectual disability, specific learning disability and mental illness : (AID)

         (e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities: (DH)

5. दिव्यांग आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात प्रथम उपलब्ध विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ४% आरक्षण पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढा शेवटच्या क्रमांकऐवजी दिव्यांग आरक्षण संधी गुणानुक्रमे दिली जाते.

6. सर्व संवर्गामध्ये दिव्यांगांचे आरक्षण देताना समान प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच उर्वरित विद्यार्थी जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणाक्रमे दिव्यांग विद्यार्थांची निवड करण्यात येते.

7. एकूण २ दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करताना वेगवेगळ्या ५ प्रवर्ग गटातील जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणाक्रमे येणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रवर्गतील ( प्रत्येकी एक ) दोन दिव्यांग विद्यार्थांची निवड करण्यात येते.

8.  एका दिव्यांग विद्यार्थ्याची निवड करताना वेगवेगळ्या ५ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे येणाऱ्या कोणत्याही एका दिव्यांग विद्यार्थ्याची निवड करण्यात येते.

9. ज्या जिल्ह्यांनी संवर्गनिहाय कोटा पूर्ण केला नाही. अशा जिल्ह्यांचा कोटा राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थांना देण्यात आलेला आहे

10. शेवटच्या दोन किंवा अधिक विद्यार्थांना सारखे गुण असल्यास खालील क्रमाने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

       a) ज्याचे गुण MAT पेपर मध्ये जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

       b) MAT पेपर मध्ये समान गुण असल्यास ज्याचे गुण SAT पेपर मधील गणित विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.

      c) SAT पेपर मधील गणित विषयात समान गुण असल्यास ज्याचे गुण विज्ञान विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.

      d) SAT पेपर मधील गणित व विज्ञान विषयात समान गुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.

      e) वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.

11. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) यांचेमार्फत केले जाते.

NMMS = NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP SCHEME EXAMINATION- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 

MATम = MENTAL ABILITY TEST - बौद्धिक क्षमता चाचणी 

SAT = SCHOLASTIC APTITUDE TEST - शालेय क्षमता चाचणी 


Post a Comment

0 Comments