१२. मुद्दा क्र ६, नवोपक्रमाची यशस्विता किंवा फलनिष्पती


 

या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

६.नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडवी.

 नवोपक्रमाची उद्दिष्टे लिहितांना आपण - हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला ? कसाकोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार ? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार,याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडलेली आहेत .

याच उद्दिष्टानुसार आपल्याला नवोप क्रमाची यशस्वीता येथे नमूद करणे आवश्यक आहे.

पुढील प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला तुमच्या नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) आपल्याला लिहिता येईल

१. माझ्या उपक्रमामुळे कोणाकोणांत बदल झाला .

२.  माझ्या उपक्रमामुळे कोणकोणते  बदल झाले

३. माझ्या उपक्रमामुळे कसे  बदल झाले.

४. मी उपक्रमासाठी कोणती साधन निर्मिती केली होती आणि तिचा काय उपयोग झाला.. .

५. माझ्या उपक्रमातील कोणकोणत्या कृती मुळे कोणता बदल झाला. ..

६. माझ्या उपक्रमातून काय व काय साध्य झाले.

७.माझ्या उपक्रमातून किती मुळे प्रगत होण्यास मदत झाली.

८.माझा हा उपक्रम किती शिक्षकांना उपयुक्त झाला.

 ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली म्हणजे नवोपक्रमाची यशस्वीता  लिहायला खूप सोपे जाते.

Post a Comment

0 Comments