१३. मुद्दा क्र ७, समारोप

 


या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

७.समारोप - आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता कसा झाला, हे विशद करने अपेक्षित आहे आणि तेही थोडक्यात

येथे तुम्ही राबवलेला नवोपक्रम किती शाळांना , किती शिक्षकांना उपयुक्त झाला आहे हे सुद्धा नमूद करणे आवश्यक आहे.

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२.स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३.नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा.याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवाला समवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४.सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५.नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६.नवोपक्रम टाईप केलेला असावा.टाईपिंग साठी Unicode या Font चाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी 1 इंच मार्जिन/समास असावा.

७.हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८.सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०१९-२० किंवा २०२०-२१ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

९.नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०.नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

११.स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंक वर विहित ठिकाणी नोंदवावी.

१२.जिल्हा स्तरावर प्रथम पाच क्रमांक निश्चित करण्यासाठी नवोपक्रमास प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. तर राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधन कारक असेल.

१३.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिके व उत्तेजनार्थ बक्षीस पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधन- कारक राहील.

१४.राज्यस्तरावरील प्रत्येक गटातील प्रथम दहा क्रमांकाच्या स्पर्धकांनी शगुन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी आपल्या नावोप्क्रमाची एक यशोगाथा/ केस स्टडी स्वरुपात मराठी व इंग्रजी भाषेतून (प्रत्येकी दोन पाने) तयार करून आणावी.

Post a Comment

0 Comments