८.मुद्दा क्र २, नवोपक्रमाची गरज व महत्व

 


या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एखादी समस्या आपल्याला जेंव्हा तीव्रतेने जाणवते तेंव्हा आपण त्यावरच्या वेगवेगळ्या उपायांचा विचार करू लागतो.जी समस्या आपल्याला जाणवलेली आहे, त्या समस्येची गरज हि एका अर्थाने व्यक्तीसापेक्ष असते. मात्र आपण निवडलेला उपक्रम शिक्षण क्षेत्रातील नवे नवे विचार प्रवाह , अध्ययन व अध्यापन पद्धती, सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम -२००९,सारखा कायदा आणि त्यांच्या अमलबजावणीतील अडचणी अशा वर्तमान कालीन संदर्भातून निर्माण झालेली नवोपक्रमाची गरज हा निकष नवोपक्रमासाठी तेवढाच महात्वाचा ठरतो. 

उपक्रम निवडण्याचे कारण

यामधून तुम्ही हा नवोपक्रम का निवडला त्याचे कारण स्पष्ट नमूद करावे.

जर तुम्ही हा उपक्रम योजला नसता तर काय परिस्थिती उद्भवू शकळी असती ही बाब स्पष्ट व्हावी.

उपक्रमाचे वेगळेपण

तुमचा उपक्रम स्थळ सापेक्ष, काळ सापेक्ष, व व्यक्ती सापेक्ष कसा नवीन आहे हे स्पष्ट करणाऱ्या दोन तीन  ओळी लिहाव्यात

उपयुक्तता

तुम्ही उपक्रम राबवल्या नंतर कोण कोणाला आणि कसा फायदा होणार आहे ते नमुद करावे.

या  नवोपक्रमाचे महत्व स्पष्ट करणारी दोन तीन वाक्ये नमूद करावीत.

वरील VIDEO मध्ये स्पर्ध्येच्या पाचही गटातील नवोपक्रमांची शीर्षके कशी असायला हवीत हे सविस्तर नमूद केले आहे. म्हणून एकवेळ VIDEO अवश्य पहा.

Post a Comment

0 Comments