९.मुद्दा क्र.3, नवोपक्रमाची उद्दिष्टे



 या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवोपक्रमाची उद्दिष्टे लिहिण्या साठी महत्वाची प्रश्नावली..

हा उपक्रम मी का करतो आहे ?

उपक्रमाचा फायदा कोणाला कसा,कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार ?

या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार ?

याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

उपक्रमाचा फायदा कोणाला ,कसा, कोणत्या स्वरुपात ,कोणत्या कृतीमुळे होणार, या उपक्रमातून काय काय आणि कोणासाठी सध्या होणार, हे विधानात्मक स्वरुपात लिहिणे अपेक्षित आहे.कारण यच्झा उद्दिष्टानुसार तुम्हाला तुमच्या उपक्रमाची यशस्वीता नोंदवावी लागते.

पुढील प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला तुमच्या नवोपक्रमाची उद्दिष्टे ठरवता येतील

१. माझ्या उपक्रमातून कोण कोणात बदल होणे अपेक्षित आहे.

२. माझ्या उपक्रमामुळे कोण कोणते  बदल होणे अपेक्षित आहे.

३. माझ्या उपक्रमामुळे कसे म्हणजेच कोणत्या टप्प्याने बदल  होणे अपेक्षित आहे.

४. मला उपक्रमासाठी काय काय करावे लागेल.

५. माझ्या उपक्रमातील कोणत्या कृती मुळे बदल घडून येतील.

६. माझ्या उपक्रमातून काय काय कोणासाठी साध्य होणार आहे.

 ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली म्हणजे उद्दिष्टे लिहायला खूप सोपी जातात.

उदा.

नवोपक्रम शीर्षक :- धरू नका ही फुलपाखरे

 

उद्दिष्टे १. प्रत्यक्ष प्रयोगातून सजीवांची उत्पत्ती कशी होते ह्याचे निरीक्षण करणे.

२. विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रान्यांचा जीवनक्रम समजण्यास संधी उपलब्ध करून देणे.

३.प्रत्यक्ष प्रयोगातून जीवन कौशल्य ,संवेदनशिलता ,सहानुभूती, आपुलकी ,जिव्हाळा, प्रेम, विध्यार्थ्यात वाढविण्यास मदत करणे.

४.विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचा विकास करणे.

Post a Comment

0 Comments