इयत्ता १२ चा निकाल लगेच घोषित होणार - महाराष्ट्र बोर्ड



इयत्ता १२ चा निकाल लगेच- LIVE DIRECT LINK
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकालाबाबत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४. प्रकटन

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.



परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.



क्र.रा.मं./परीक्षा-२/१८३४

पुणे - ४११००४

दिनांकः ३०/०४/२०२६

प्रति,

मा. संपादक

वृत्तवाहिनी / वृत्तपत्र (सर्व) पुणे

विषयः- फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत...

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद, शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या प्रतिनिधींना पाठविण्यात यावे.

(डॉ. दिपक माळी) सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४.



Post a Comment

0 Comments