३० दिवसात मराठी वाचन व लेखन कृतिपुस्तिका - निपुण महाराष्ट्र




३० दिवसात मराठी वाचन व लेखन कृतिपुस्तिका 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा देऊळगाव राजा येथील सहाय्यक शिक्षिका सौ. रेखा सुरेश शिंगणे यांच्या ३० दिवसात मराठी वाचन व लेखन या कृतिपुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे डॉ. जे. ओ. भटकर साहेब प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा, मा. श्री. बी.आर.खरात साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद बुलढाणा, डॉ. समाधान डुकरे जेष्ठ अधिव्याख्याता, डॉ. मारोती गायकवाड जेष्ठ अधिव्याख्याता, मोहम्मद अकिल अब्दुल मन्सूर साहेब सहाय्यक योजना अधिकारी, वाघ साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा, डॉ. राजेंद्र अजगर अधिव्याख्याता, डॉ. पी. बी. पडोळकर अधिव्याख्याता, उल्हास वाळेकर साधनव्यक्ती यांचे हस्ते संपन्न झाले.

निपुण महाराष्ट्र अभियान उपक्रम अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता मराठी वाचन व लेखनाची गती वाढवण्यासाठी सदर कृतीपुस्तिका उपयुक्त आहे. कृतीपुस्तिकेचे आकर्षक मुखपृष्ठ प्रेमचंद राठोड यांनी तयार केलेले आहे.

या कृतिपुस्तिकेत अक्षरांचे अवयव, अक्षरांचे स्ट्रोक, अक्षर ओळख,अक्षर ओळखा व गोल करा कृती, स्वरचिन्ह ओळख, चौदाखडी सराव, अ ते ऑ स्तरावरील शब्द आणि वाक्य सराव, वेगवेगळ्या सर्व प्रकारची जोडाक्षरे सराव, मराठी अंक अक्षरी लेखन सराव, मराठी सोपे व कठीण वाचनपाठ, वाक्य टेबल, वाक्य पिऱ्यामिड, दोन शब्दांचे वाक्य,तीन शब्दांचे वाक्य,चार शब्दांचे वाक्य,पाच शब्दांचे वाक्य, सहा शब्दांचे वाक्य, सात शब्दांचे वाक्य, व आठ शब्दांचे वाक्य सराव, स्वताची ओळख, विरामचीन्ह ओळख व विरामचीन्हयुक्त वाक्य सराव इत्यादी कृती पाच मार्चच्या शासन निर्णयानुसार समाविष्ठ आहेत.

कृतीपुस्तीकेची किंमत ८० रुपये असून माऊली प्रकाशन द्वारा प्रकाशित झालेली आहे 
पहिल्या दिवसापासून तिसाव्या दिवसापर्यंतच्या कृती कार्यक्रमाचे व्हिडीओ असलेला क्यू आर कोड या पुस्तिकेत उपलब्ध आहे. प्रत्येक दिवसाचा व्हिडीओ पालकांनी मोबाईल वर किंवा शिक्षकांनी टी.व्ही. वर लावल्याने व्हिडीओतील मार्गदर्शनानुसार विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतात. कृतिपुस्तिकेत लिहिण्याचा सराव करण्यासाठी जागा देण्यात आलेली असल्याने वेगळी वही विकत घेण्याची गरज नाही. कृतीपुस्तिका सोडवत असताना व्हिडिओची साथ असल्याने वैयक्तिक मार्गदर्शन घरबसल्या शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवणारे व चित्रकलेतून अक्षरबोध करून देणारे, डिजिटल संसाधनाच्या सुयोग्य वापरातून तयार केलेली ही एकमेव कृतीपुस्तिका आहे. असे मनोगत लेखीकेने यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळ्या करिता आलेले जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. लेखिकेला दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या प्रसंगी डॉ राजेंद्र अजगर अधिव्याख्याता यांचे हस्ते प्रमाणपत्र, शिल्ड व डी.बी.टी द्वारे बक्षिसाची रक्कम देवून सौ. रेखा सुरेश शिंगणे यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.पी.बी.पडोळकर अधिव्याख्याता यांनी केले. तर आभार प्रदर्शन उल्हास वाळेकर साधनव्यक्ती यांनी केले.

Post a Comment

0 Comments