नवोपक्रम स्पर्धा २०२२-२३ चे पारितोषिक वितरण संपन्न


नवोपक्रम स्पर्धा २०२२-२३ चे पारितोषिक वितरण संपन्न 

राज्य शैक्षणिक संशोधन पुणे द्वारा यावर्षी घेतलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी विद्या परिषद पुणे चे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, संशोधन विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय थिटे, समन्वयक अमोल शिनगारे व प्रभाकर क्षिरसागर उपस्थित होते. याप्रसंगी पारितोषिक वितरणाच्या आधी नवोपक्रमशील शिक्षकांच्या नावोपक्रमांचे सादरीकरण झाले.

प्राथमिक शिक्षक विभागामधून खालील नवोपक्रमशील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.











राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23, प्राथमिक शिक्षक व मुख्याद्यापक गटातील पारितोषिक विजेते.

प्रथम क्रमांक 

श्रीम. वनिता मल्हारी मोरे (सांगली)

'बाहुलीनाट्य : अध्ययन अध्यापनाचे प्रभावी माध्यम'


द्वितीय क्रमांक 

श्री. सचिन कुंडलिक देसाई (कोल्हापूर)

 दुसरे पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल..... देऊ अधिकार प्रत्येक कळीस फुलण्याचा व खुलण्याचा.


तृतीय क्रमांक 

श्री.बालाजी बाबुराव जाधव (सातारा)

'तंत्रशिक्षणातून कौशल्य विकसन.'


चतुर्थ क्रमांक 

श्री.भक्तराज मनसुख गर्जे (सांगली)

'माझी भाकरी'


पाचवा क्रमांक 

श्री.श्रीकांत गटय्या काटेलवार (गडचिरोली)

निसर्गाच्या सानिध्यात राहूया, बोलीभाषेतून प्रमाणभाषा शिकूया'.


उत्तेजनार्थ १

श्री.सतिश दिनकर कुंभार (कोल्हापूर)

जाणीव स्पर्शाची वेळीच शिक्षण, अन्यायापासून रक्षण


उत्तेजनार्थ-2

श्रीम. माधवी मुकुंद शिनगारे (कोल्हापूर)

'स्मार्ट शब्दांजली'


राज्यस्तर सहभाग

श्रीम. रेणूका कमलाकर कथलकर (वर्धा)

बालचित्रकाव्य


राज्यस्तर सहभाग

श्री.थोरवे स्वानंद बलभीम (बीड)

भाषिक खेळांच्या माध्यमातून इंग्रजी भाषा कौशल्याचा विकास.


राज्यस्तर सहभाग

श्री.संतोष अंबादासराव सुतार (बीड)

मी बुद्धिमान : डिजीटल स्वयंअध्ययनमाला'

प्राथमिक शिक्षक व मुख्याद्यापक गटातील सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!!

लवकरच पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचे नवोपक्रम pdf अपलोड होत आहेत 


Post a Comment

0 Comments