महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ DISTRICT TECHNICAL SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES



महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ DISTRICT TECHNICAL SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट२०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७” चा लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ०१ एप्रिल२०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर लेखी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रस्तुत लेखी परीक्षेचा निकाल मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आला आहे अर्हताप्राप्त ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांच्या आवेदनपत्रात नमूद केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अधीन राहुन मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास तसेच अर्जातील दावे तपासणीअंती ग्राह्य नसल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी मुलाखतीच्या वा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व सदर उमेदवारांनी आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे व शासनाच्या संबंधित आस्थापना अधिकारी / कार्यालय प्रमुख विभाग प्रमुखांकडून प्रमाणित करुन देण्यात आलेल्या परिशिष्टाची प्रत तसेच प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींसह (२ संच) मुलाखतीकरिता उपस्थित रहावे. (उमेदवारांनी मुलाखतीवेळी सादर करावयाचे परिशिष्ट आयोगाच्या संकेतस्थळावर 'Downloads' शीर्षकांतर्गत अनु. क्र. ८ वर उपलब्ध आहे.) उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्याबाबतचे पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिले जाईल तसेच सदर लेखी परीक्षेच्या निकालानुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल. मुलाखत कार्यक्रमानुसार उमेदवारांनी मुलाखतीकरिता विहित दिनांकास वेळेवर स्वखर्चाने उपस्थित रहावे असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी आयोगाच्या पोर्टल वर प्रसिद्ध केले आहे

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 MAHARASHTRA EDUCATION SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES

निकालाचे प्रसिद्धीपत्रक

 MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ,MAHARASHTRA EDUCATION SERVICES GROUP B [ADMINISTRATIVE BRANCH] LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION 2017 DISTRICT TECHNICAL SERVICE, LIST OF QUALIFIED CANDIDATES


Post a Comment

0 Comments