इयत्ता पहिलीत प्रवेश देतांना बालकाचे कमीत कमी किती वय असावे, Class 1st Admission Required Minimum Age

 


 इयत्ता पहिलीत प्रवेश देतांना बालकाचे कमीत कमी किती वय असावे, Class 1st Admission Required Minimum Age

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/09/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहे म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी किमान वयोमर्यादा माहे 31 डिसेंबर 2022 अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे

प्रवेशाचा वर्ग

वयोमर्यादा

दि 31 डिसेंबर 2022 रोजीचे किमान वय

प्ले ग्रुप नर्सरी

01/10/2018 ते 31/12/2019

3 वर्ष

ज्युनियर केजी

01/10/2017 ते 31/12/2018

4 वर्ष

सिनियर केजी

01/10/2016 ते 31/12/2017

5 वर्ष

इयत्ता पहिली

01/10/2015 ते 31/12/2016

6 वर्ष

पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही सदरील शासन निर्णय दिनांक 18/09/2020 मुख्यतः इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे शासनाने वरीलप्रमाणे शासन निर्णयानुसार किमान – कमीत कमी- वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे अशा आशयाचे पत्र दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी शिक्षण संचालनालय पुणे द्वारा निर्गमित केलेले आहे म्हणून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकाचे 31 डिसेंबर 2022 रोजी कमीत कमी म्हणजेच किमान वय 6 - सहा वर्षे पूर्ण असावे म्हणजेच प्रवेशित होणाऱ्या बालकाचा जन्म 1 ऑक्टोबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 दरम्यान झालेला असावा

शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयासंदार्भातील दिनांक 25/07/2019 रोजीचा महत्वाचा शासन निर्णय

शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयासंदार्भातील दिनांक 18/09/2020 रोजीचा महत्वाचा शासन निर्णय

इयत्ता पहिलीत दाखल करतांना विद्यार्थ्याची आवश्यक असलेली माहिती खालील नमुन्यात मुख्याध्यापकाकडे असावी

इयत्ता पहिलीत प्रवेश देतांना बालकाचे जास्तीत जास्त किती वय असावे, Class 1st Admission Required Maximum Age- Click Here

Post a Comment

0 Comments