शासन
निर्णय क्रमांक-आरटीई-2018/प्रक्र180/एसडी-1 दिनांक 18/09/2020 आणि शासन निर्णय क्रमंक-आरटीई-2019/प्रक्र 199/एसडी-1 दिनांक 25/07/2019 या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे
किमान वय निश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत- शाळा
प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/09/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान- कमीत
कमी वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही, मानिव दिनांक बदलामुळे
माहे जूलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ
नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा माहे 31 डिसेंबर 2022 अखेर खालील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे
प्रवेशाचा वर्ग |
वयोमर्यादा |
दि 31 डिसेंबर 2022 रोजीचे कमाल वय |
प्ले ग्रुप नर्सरी |
01/07/2018
ते 31/12/2019 |
4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
ज्युनियर केजी |
01/07/2017
ते 31/12/2018 |
5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
सिनियर केजी |
01/07/2016
ते 31/12/2017 |
6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
इयत्ता पहिली |
01/07/2015
ते 31/12/2016 |
7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
आरटीई 25 टक्के प्रवेशाकरीता वयोमर्यादेबाबत विविध माध्यमांद्वारे मोफत प्रसिध्दी देण्यात आलेली आहे वयोमर्यादेबाबत ऑनलाईन पोर्टलवर तसेच सर्व शाळांना कळविण्यात आलेले आहे म्हणून कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आलेली आहे, इयत्ता पहिलीत प्रवेश देतांना दिनांक 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 दरम्यान जन्मलेल्या बालकाचे वय जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असावे, Class 1st Admission Required Maximum Age should be 7 years 5 months 30 days यासंदर्भातील दिनांक 28/02/2022 चे महत्वाचे पत्र
शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयासंदार्भातील दिनांक 25/07/2019 रोजीचा महत्वाचा शासन निर्णय
शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयासंदार्भातील दिनांक 18/09/2020 रोजीचा महत्वाचा शासन निर्णय
इयत्ता पहिलीत दाखल करतांना विद्यार्थ्याची आवश्यक असलेली माहिती खालील नमुन्यात मुख्याध्यापकाकडे असावी
0 Comments