इयत्ता आठवी मराठी बालभारती संदर्भातील वर्णनात्मक नोंदी

 

इयत्ता आठवी मराठी बालभारती संदर्भातील वर्णनात्मक नोंदी

प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत

मराठी बालभारती संदर्भातील वर्णनात्मक नोंदी

सकारात्मक नोंदी-

चित्र वर्णन करतो / ते

प्रश्न विचारतो / ते

योग्य आवाजात वाचन करतो / ते

शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो / ते

पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो / ते

चित्रांच्या व त्याच्या नावाच्या जोड्या लावतो / ते

समान जोड अक्षरांच्या जोडया लावतो / ते

गटामध्ये प्रकट वाचन करतो / ते

फलकावरील शब्द ओळखतो / ते

गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो / ते

पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो / ते

स्वतःचे नावपत्ता व कुटुंबाविषयी माहिती सांगतो / ते

स्वाध्याय सोडवतांना गरज पडेल तेथे घरातील मोठ्या माणसांची मदत घेतो / ते

मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो / ते

सामुहिकरित्या अभिनय सादर करतो / ते

मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो / ते

मुद्दयांच्या आधारे कथा तयार करून सांगतो /ते

चाचणी वेळेत अचूक स्वच्छ प्रकारे लिहितो /ते

चित्रे पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो /ते

चाचणीतील उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहितो /ते

मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो /ते

आवडीचे मजकुराचे वाचन करतो / ते

आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो / ते

चित्रकथा वाचतो / ते

कविता अभिनयासह सादर करतो / ते

बडबड गीताचे गायन समूहात करतो / ते

ध्वनिमधील साम्यवाद ओळखतो / ते

आकृतीमध्ये योग्य रंग भरतो / ते

आकृतीमधील साम्यभेद ओळखतो / ते

सुचनेप्रमाणे शब्द लिहितो / ते

श्रुतलेखन करतो / ते

शालेय उपक्रमात सतत सहभागी असतो /ते

बडबडगीत तालासुरात सादर करतो /ते

वहीवर पेन्सिल च्या सहाय्याने मुळाक्षरे गिरवतो / ते

चौदाखडी चे सुस्पष्ट वाचन करतो / ते

वाचनपाठ मधील एक एक ओळ सुस्पष्ट वाचतो / ते

शब्द तयार करतो व वाचन करतो / ते

निरीक्षण करतो व माहिती सांगतो / ते

प्राणीपक्ष्यांची माहिती सांगतो / ते

आवाजातील साम्यभेद ओळखतो / ते

दिलेल्या चित्रातील आकार भेद ओळखतो / ते

शब्दाचे प्रकट वाचन करतो / ते

शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो / ते

चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो /ते

संवादाचे अभिनयासह सादरीकरण करतो /ते

प्रकल्प सुंदररीत्या सादर करतो /ते

वर्णनात्मक निबंध सुंदर लेखन करतो /ते

शब्द वाचून अर्थ सांगतो / ते

स्वताचा नवीन अनुभव सांगतो / ते

पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करून महिती सांगतो / ते

आवडलेली कथा सांगतो / ते

सांगितलेल्या गोष्टीवर आधारित चित्र रेखाटतो / ते

स्वता:च्या भाषेत गाणी गातो / ते

कथा सांगतो / ते

कृतियुक्त गाणी गातो  / ते

मित्रांशी मुक्तपणे गप्पा मारतो / ते

परिपाठात कृतियुक्त सहभागी घेतो / ते

शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो / ते

प्राणीपक्षी व पानाफुलांचे चित्र काढतो / ते

आपल्या दिनक्रम सांगतो / ते

स्वताचे मत मांडतो / ते

शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो / ते

नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो / ते

वर्ग मित्रांशी संवाद करतो / ते

स्वताला आवडणारी गोष्ट स्वताच्या शब्दात सांगतो / ते

खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो / ते

स्वताचे अनुभव वर्गात सांगतो / ते

स्वताच्या भावनाविचार व अनुभव व्यक्त करतो / ते

परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो / ते

प्रकल्पसाठी साहित्य सुंदररित्या जमा करतो /ते

चाचणी सुंदर रित्या लिहितो /ते

कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो /ते

इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

अडथळ्याच्या नोंदी-

दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही

इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो / ते

दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही

सहजपणे भाषण करता येत नाही

बोली भाषेत प्रमाण भाषा वापरात नाही

वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही

स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही

शब्द व वाक्य चुकीचे वापरतो / ते

प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते

दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही

अपूर्ण वाक्य ऐकतो परंतु वाक्य पूर्ण करता येत नाही

बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो / ते

सुचविलेले प्रसंग सांगतांना अडखळतो / ते

सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण अडखळत करतो / ते

सुचविलेला मजकूर लिहितांना चुका करतो / ते

कथा ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते

शब्द लक्षपूर्वक ऐकत नाही

दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही

सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही

इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो / ते

मोठ्यांचा मान ठेवतांना चुकीचे शब्द वापरतो / ते

संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते

मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही

दिलेल्या सूचना समजून घेत नाही

सुचवलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो / ते

सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो / ते

स्वताच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही

सुचविलेले भाग वाचन करताना अडखळतो / ते

सुचविलेले भाग वाचताना शब्दोचार अशुद्ध करतो / ते

सुचविलेला पाठ्य भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो / ते

दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही

कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही


Post a Comment

0 Comments