बलसागर भारत होवो - इयत्ता 6 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 1, समूहगीत व MCQ स्वाध्याय,Balsagar Bharat Howo, class 6 marathi
बलसागर भारत होवो - या समूह्गीताचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा समूहगीत कितपत समजले हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,
स्वाध्याय -
आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या Submit निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी View Score अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck
समूहगीताचा अर्थ-
1 बलसागर ----- मरायला हो ॥१॥
अर्थ - आपला भारत देश हा शक्तिशाली व्हावा व सर्व जगात त्याची ख्याती पसरावी. यासाठी जनसेवेचे व्रत मी हाती घेतले आहे. भारतासाठी माझे प्राण दयायला देखील मी तयार आहे.
2 वैभवी-----सहाय्याला हो ॥२॥
अर्थ - माझ्या देशाला वैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करणार आहे. त्यासाठी भेदभाव, अराजकता अशांचा अंधार दूर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्व बांधव मला सहाय्य करायला या. 3 हातात----- करायाला हो ॥३॥
अर्थ - भारताच्या वैभवासाठी आपण सगळे एकत्र येऊ. हातात हात घेऊन मनात ऐक्याचाएकजुटीचा मंत्र म्हणत आपण हे कार्य करायला सिद्ध होऊ या.
4 करि दिव्य-------निजपदा लाहो ॥४॥
अर्थ – हाती दिव्य पताका घेऊन आपण प्रिय भारताविषयीची गीते गाऊ या. आपल्या भारताचा पराक्रम संपूर्ण जगात दाखवू या.
5 या उठा -------राहो ॥५॥
अर्थ - चला यासाठी आपण आपल्या पराक्रमाची शर्थ करू या. त्यासाठी आपण शक्य ते सगळे प्रयत्न करू या. असे जर केले नाही तर आपले जीवन वाया जाईल. त्यामुळे भारताचे भाग्य असेच उजळून निघो.
6 ही माय ---------- येवो ॥६॥
अर्थ – या सर्वांमुळे भारताचे नाव मोठे होईल. त्याचे वैभव वाढेल. जगाला शांती देणारा भारत हा महान देश होईल व हा सोन्याचा दिवस लवकरात लवकर उदयाला येवो.
3- बलसागर भारत होवो समूह्गीतावर आधारित MCQ स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments