१०० दिवस वाचन अभियान- 100 Days Reading Campaign

१०० दिवस वाचन अभियान- 100 Days Reading Campaign

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी 1 जानेवारी 2022 पासून 100 दिवसांच्या 'पढे भारत' या  वाचन अभियानाचा आरंभ केला आहे हे 100 दिवसांचे अभियान विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, कारण त्यामुळे त्यांची कल्पकता, तर्कशुद्ध विचार, शब्दभांडार आणि तोंडी आणि लिखित व्यक्त होण्याच्या क्षमतांचा विकास होऊ शकेल त्यांच्या सभोवतालच्या आणि वास्तविक जीवनशैलीशी नाते जोडण्यासही हे  सहाय्यक ठरेल बालवाडी  ते आठवी इयत्तेत शिकत असलेली  मुले या अभियानाचा भाग असतील

हे अभियान 1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 20 22 पर्यंत 100 दिवस म्हणजेच 14 आठवडे आयोजित केले जाईल या  वाचन अभियानात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मुले, शिक्षक, पालक , समाज , शैक्षणिक प्रशासक इत्यादींसह सर्व हितसंबंधितांचा सहभाग अपेक्षित आहे 100 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 14 आठवडे, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक वयोगटातील समूहाला योग्य अशा साप्ताहिक स्वाध्यायांची रचना करण्यात आली असून वाचन आनंददायी व्हावे आणि वाचनानंदाशी जीवनभर नाळ जोडली जावी,या हेतूने त्यांची आखणी केली आहे या अभियानातील स्वाध्यायांसाठी वयानुरुप व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार  करण्यात आली असून त्यांचे साप्ताहिक कॅलेंडर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे शिक्षक, पालक, मित्र, भावंडांच्या किंवा इतर कौटुंबिक सदस्यांच्या मदतीने मुलांना यांचा सराव करता येऊ शकतो अभियान प्रभावी होण्यासाठी रचना केलेले स्वाध्याय सरल आणि आनंददायी ठेवले गेले आहेत  जेणेकरुन शाळा बंद असली तरी घरी ,मित्रमैत्रिणी, आणि भावंडांच्या मदतीने देखील ते सहजपणे करता येतील

1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 20 22 पर्यंत 100 दिवस दरम्यान होणाऱ्या या उपक्रमात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे एससीईआरटी संचालक एम डी सिंह यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने शंभर दिवस वाचन अभियान सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवले जाणार आहे त्यात बालवाटिका ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यासाठी आठवडानिहाय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे

त्यात वर्गातील वातावरण आनंददायी राखण्यासह विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे, गोष्टीचा शनिवार, रीड अलाऊड अशा मोबाईल उपयोजनांच्या वापराबाबत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन, वस्तीस्तरावर वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम, वाचन मेळावे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आदी उपक्रम राबवले जातील त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, महापालिकेचा शिक्षण विभाग अशा स्तरांवर उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे वाचन अभियानाच्या अंमलबजावणीबाबत अहवाल आणि ध्वनिचित्रफिती तयार कराव्यात, अभियानाविषयी समाज माध्यमांमध्ये #100daysReadingCampaign आणि #PadheBharat  हे इंग्रजी हॅशटॅग वापरून प्रचार करावा, असेही परिपत्रकामध्ये नमूद केले आहे

100 दिवस वाचन अभियान 100 Days Reading Campaign साठी उपक्रमांचे नियोजन आपल्याला हव्या असलेल्या वर्गावर क्लिक करून पाहू शकता

मार्गदर्शिका

बालवाटिका अंगणवाडी बालवाडी

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी

इयत्ता पाचवी

इयत्ता सहावी

इयत्ता सातवी

इयत्ता आठवी


दिनांक 1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 दरम्यान तारखेनुसार 14 आठवडे दर्शवणारा तक्ता 

Post a Comment

0 Comments