महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण- प्रशिक्षणार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा वरिष्ठ  वेतन श्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्व्रारा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सन २०२१-२२ करिता ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, या प्रशिक्षणाची नोंदणी कशी करावी व दिनांक २२-११-२०२१ च्या पत्रात काय नमूद केले आहे, तसेच या लिंक वर नोंदणी करण्याअगोदर प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सविस्तर आपण पाहणार आहोत वरिष्ठ  वेतन श्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण रजीष्ट्रेशन करण्यासाठी लिंक

https://training.scertmaha.ac.in/

शालार्थ क्रमांक असलेल्या शिक्षकांसाठी Online प्रशिक्षण रजीष्ट्रेशन करण्यासाठी लिंक

वरिष्ठ  वेतन श्रेणी १२ वर्ष सेवा करिता लिंक https://training.scertmaha.ac.in/senior2/senior.aspx

निवड श्रेणी 24  करिता लिंक https://training.scertmaha.ac.in/selection4/selection.aspx

शालार्थ क्रमांक नसलेल्या शिक्षकांसाठी Online प्रशिक्षण रजीष्ट्रेशन करण्यासाठी लिंक

वरिष्ठ  वेतन श्रेणी १२ वर्ष सेवा करिता लिंक https://training.scertmaha.ac.in/senior8/Register.aspx?ttype=1

निवड श्रेणी 24  करिता लिंक https://training.scertmaha.ac.in/selection7/Register.aspx?ttype=2

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्व्रारा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण  चे pdf पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्व्रारा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण प्रश्नोत्तरे

1- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रण कोणाकडे आहे

उत्तर- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडे

2- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणत्या स्वरुपात होणार आहे

उत्तर - Online स्वरुपात 

3- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी

उत्तर -  https://training.scertmaha.ac.in/ या लिंक ला क्लिक करून Online स्वरुपात पोर्टल वर

४- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कोण कोण करू शकते

उत्तर - प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य

5- वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करिता किती वर्ष नोकरी किंवा सेवा झालेली असावी

उत्तर- दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच सेवेची १२ वर्ष पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करिता पात्र आहेत

६- निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करिता किती वर्ष नोकरी किंवा सेवा झालेली असावी

उत्तर- दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी 24 वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच सेवेची 24 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करिता पात्र आहेत 

7- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी किती तारखेपर्यंत करावी

उत्तर- दिनांक 23-११-२०२१ ते 23-१२-२०२१ पर्यंत

8- प्रशिक्षणाची अपडेट माहिती कशी मिळेल

उत्तर - आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करत असतांना जो email address नोंदवला आही त्या email address वर प्रशिक्षणाची अपडेट माहिती मिळेल

9- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करत असतांना नोंदणी करणाऱ्या शिक्षकाजवळ कोणती अत्यावश्यक माहिती असावी

उत्तर- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करत असतांना नोंदणी करणाऱ्या शिक्षकाजवळ स्वताचा शालार्थ id , जन्म दिनांक,मोबाईल क्रमांक, शाळेचा udise कोड/क्रमांक,email address, मोबाईल क्रमांक व मोबाईल- OTP करिता-प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी बँक खात्याचा तपशील ATM/CREDIT कार्ड UPI पेमेंट इत्यादी  अत्यावश्यक माहिती असावी

10-वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे प्रशिक्षण शुल्क किती रुपये आहे

उत्तर- रुपये २००० केवळ- दोन हजार रुपये मात्र

११- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे प्रशिक्षण शुल्क २००० रुपये भरल्यानंतर जर प्रशिक्षण करावयाचे नाही असे मनात आल्यास  प्रशिक्षण शुल्क परत मिळेल का

उत्तर- एकदा जमा केलेले  प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही,त्यामुळे नोंदणी करण्याअगोदर विचार करूनच वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करावी

१२- नोंदणी करण्यासाठी माझा गट क्रमांक कोणता असेल

उत्तर- गट क्रमांक 1- प्राथमिक गट

गट क्रमांक 2- माध्यमिक गट

गट क्रमांक 3 - उच्च माध्यमिक गट

गट क्रमांक ४- अध्यापक विद्यालय गट

13- नोंदणी करत असतांना काही तांत्रिक अडचण आल्यास काय करावे

उत्तर - आपल्या स्वतःच्या email address वरून trainingsupport@maa.ac.in या अधिकृत email वर संपर्क करावा

आमच्या  टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments