इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१
शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग यांचेकडील -१.शासन निर्णय क्रमांक परीक्षा
०५२१/प्र.क्र.४३/ एसडी-२, दि.२८ मे २०२१ -२.शासन निर्णय
क्रमांक परीक्षा ०६२१/प्र.क्र.५२/एसडी-२, दि.२४ जून २०२१ ३.शासनाचे पत्र क्र.प्रवेश-०५२१/प्र.क्र.५२/एसडी-२, दि.१२ जुलै २०२१ या शासन निर्णय
नुसार सन २०२१-२२ या वर्षासाठी इ.११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा CET
आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, विषय, एकूण गुण, वेळ, शुल्क व इतर
अनुषंगिक बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ३ मधील शासन
पत्रानुसार सदर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे
सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
या परीक्षेचे सर्वसाधारण स्वरुप पुढीलप्रमाणे असेल
१. इयत्ता ११ वी
प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा CET ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी
संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ
इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या -राज्य मंडळ, C.B.S.E.,C.I.S.C.E., सर्व आंतररष्ट्रीय मंडळे इत्यादी- माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र -इ.१०वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण/ प्रविष्ट
झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल. २. सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल. ३. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ४. सदर परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचाराहील. ५. सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमांतून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. ६. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करुन प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल. ७. सदर सामाईक प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असेल. यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हेवस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे Multiple Choice Objective type Questions असेल.
१. इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. २. सदर परीक्षेच्या १०० गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका/पेपरमध्ये उपरोक्त चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे १०० प्रश्न असतील, सदर गुणविभागणीचा तपशिल खालीलप्रमाणे,
इंग्रजी- गुण 25
गणित भाग १ व भाग
२- गुण 25
विज्ञान आणि
तंत्रज्ञान भाग १ व भाग २ - गुण 25
सामाजिक शास्त्रे
-इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल- गुण 25
एकूण गुण- 100
गुण
३.
विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला १.
इंग्रजी २. मराठी ३. गुजराती ४. कन्नड ५. उर्दू ६. सिंधी ७. तेलुगु ८. हिंदी या आठ
माध्यमांपैकी एक/ दोन माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका
उपलब्ध करुन देण्यात येईल.
सेमी इंग्रजी या
माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये
इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि
सामाजिक शास्त्रे -इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल या विषयाचे प्रश्न
विद्यार्थ्याने आवेदनपत्रात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध असतील.
४. सदर ऑफलाईन
परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे Multiple Choice Objective type Questions असेल. शासन निर्णयात निश्चित केल्याप्रमाणे
राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन
करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या चार विषयांच्या
अभ्यासक्रमातील घटकांचा तपशिल सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आलेला आहे.
प्रश्नपत्रिकेमध्ये सदर घटकांवर आधारीत प्रश्नांचा समावेश असेल. ६. कोविड-१९
च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ साठी विषयनिहाय २५% अभ्यासक्रम/ घटक-उपघटक
वगळण्यात आलेले आहेत. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या भागांवर
आधारीत प्रश्न समाविष्ट नसतील.
इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ च्या परीक्षेसाठी चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1 Comments
Top most collage
ReplyDelete