गतवर्षी विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार वर्गोन्नती दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कसे कराल ?

  


गतवर्षी विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार वर्गोन्नती दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कसे कराल ?

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण पुणे द्वारे खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या.

यासंदर्भातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे चे परिपत्रक पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE  बटनावर वर क्लिक करा.


यामधील मुद्दा क्रमांक ४ मध्ये 
विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करणे बद्दल स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे ,

१. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. २ ( शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक पीआरई/२०१०/(१३६/१०) प्राशि ५ दिनांक २० ऑगस्ट२०१०अन्वये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.


२. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्याची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.


३. शैक्षणिक सत्र २०२०- २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिकसंकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. ५  (  शासन पत्र संकीर्ण २०२१/प्र.क.६०/एस.डी-६ दिनांक ०६ एप्रिल,२०२१ )  अन्वये शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर "आर.टी.ई अॅक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत ” असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.


४. उपरोक्त मुद्दा १ व २ मधील क - २ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. तसेच नियमित वर्गाअध्यापनाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात यावी.

तर मग ह्या " विद्यार्थी पुस्तिका " कोठे मिळतील असा प्रश्न आपल्या मनात असेल तर त्या " विद्यार्थी पुस्तिका " आपल्या साठी येथे उपलब्ध करून देत आहोत. आपण ह्या पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्या पुस्तीकामधील माहितीनुसार विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करू शकता. 

( टीप- कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे )

पुस्तिकेच्या चित्राला किंवा नावाला क्लिक करा आणि पुस्तिका पहा अथवा डाउनलोड करा.

इयत्ता 1 ते 4 मराठी



इयत्ता 1 ते 4 गणित



इयत्ता 5 ते 6 मराठी, हिंदी, इंग्रजी



इयत्ता 5 ते 8 गणित



इयत्ता 7 ते 8 मराठी, हिंदी, इंग्रजी



शिक्षक मार्गदर्शिका



 

वर्गोन्नती दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी - इयत्ता पहिली ते चौथी - मराठी गणित विषय - प्रशिक्षण नियोजन डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा 




Post a Comment

0 Comments