स्वाध्याय उपक्रम पुन्हा पुढील चार आठवडे असणार आहे. (१५ मे ते ५ जून २०२१)

 


स्वाध्याय उपक्रम पुन्हा पुढील चार आठवडे असणार आहे. (१५ मे ते ५ जून २०२१)

स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana

 या आठवड्यात परत येत आहे! (दि 15 मे २०२१ पासून)

National FLN मिशन आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१) पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत.

 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल.

 आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे

 

ह्या आठवड्या (दि. १५/०५/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध:

कोणासाठी - १ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी

माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू

विषय - गणित

१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न 

आणि 

६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील

कृपया विद्यार्थ्यांना पुढील चार आठवडे स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana उपक्रमात सहभागी करू या.

 सरावासाठी खालील CLICK HERE बटनावर क्लिक करा -



Post a Comment

0 Comments