एमकेसीएल नॉलेज
फाउंडेशनचे प्रसिद्धीपत्रका नुसार इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी "टिलीमिली
नाटिकांची महामालिका" मनोरंजनातून अभ्यास- सोमवार, १५ मार्च २०२१
पासून दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण सुरू झाले आहे.
‘एमकेसीएल नॉलेज
फाऊन्डेशन' या पुण्यातील स्वयंसेवी
संस्थेने पाचवी ते आठवी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी
माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर “टिलीमिली नाटिकां" द्वारे मनोरंजनातून
देण्याचे ठरविले आहे. प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे ४८
नाटिकांचा संच सादर केला जाईल. सर्व इयत्ता मिळून एकूण १९२ नाटिका सादर केल्या
जातील.
महाराष्ट्राच्या
महानगरांपासून तर आदिवासी पाड्यांपर्यंत राहणाऱ्या लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांनी,
पालकांनी व शिक्षकांनी या मालिकेच्या पहिल्या
सत्रातील दैनंदिन प्रसारणाचा लाभ घेतला होता. आता दुसऱ्या सत्रातही या नि:शुल्क
सेवेचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाऱ्या लक्षावधी टिली व मिली' अर्थात मुले व मुली त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी
संचावर दिनांक १५ मार्च २०२१ पासून १० एप्रिल २०२१ पर्यंत दररोज घेऊ शकतील.
बालरंगभूमी
क्षेत्रातील प्रयोगशील मार्गदर्शिका श्रीमती स्वाती उपाध्ये तसेच त्यांच्या
प्रेरणा - एक कलामंच" या टीममधील तज्ज्ञ सहकारी व उत्साही आणि अनुभवी असे
बालकुमार कलाकार या महामालिकेच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत. ही मालिका मुलांसोबत
पालकांनी, शिक्षकांनी व मनोरंजात्मक
असल्याने इतर सर्वांनीही अवश्य पहावी. मुलांनी सादर केलेल्या नाटिका हेच या
मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी समजणाऱ्या पण अमराठी माध्यमात
शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मालिकेचा पुरेपूर आस्वाद घेता येईल.
"टिलीमिली"
नाटिकांमध्ये रंजक संवाद, वेधक प्रसंग,
कसदार अभिनय, कलात्मक नेपथ्य, बाहुल्यांचे खेळ, शेंडो प्ले,
चित्रे, प्रतिकृती, प्रयोग, शोध, खेळ, संगीत, गाणी, गप्पागोष्टी या सर्वांची रेलचेल पहायला मिळेल. मुले नाट्यमय कृतींतून
परस्परांच्या मदतीने स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च कशी करतात आणि शिकण्याचा आनंद
लुटतात हे या मालिकेत सतत बघायला मिळेल. आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया आणि
नाट्यामधून येणारी रंजकता यांचा सुरेख संगम या मालिकेतील प्रत्येक नाटिकेत अनुभवता
येईल. 'सह्याद्री' दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४,
एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या
क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.
“टिलीमिली" महामालिकेचे दैनंदिन प्रसारण ( रविवार वगळून ) खालीलप्रमाणे असेल:
इयत्ता
पाचवी ते आठवी, सोमवार- १५ मार्च २०२१ ते शनिवार-१०
एप्रिल २०२१ पर्यंत
इयत्ता आठवी= सकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत
सातवी सकाळी= ९.०० ते १०.०० वाजेपर्यंत
सहावी सकाळी= १०.०० ते ११.०० वाजेपर्यंत
पाचवी सकाळी= ११.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत
यथे दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या- त्या
इयत्तेसाठी प्रत्येकी २५ मिनिटांच्या दोन नाटिका सादर होतील व त्यात ५ मिनिटांचे
मध्यंतर असेल.
याबद्दलचे एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
1 Comments
Poonam
ReplyDelete