अंतिम राज्यस्तरीय सादरीकरण
फेरीसाठी यावर्षी ज्या स्पर्धकांची निवड झाली आहे त्या स्पर्धकांची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
महाराष्ट्र
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि
प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत.
शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही
नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे
वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत
आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व
शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन
२०२०-२१ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. समग्र
शिक्षा नुसार SCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च
माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित
करण्यात आलेली होती.
१.पूर्व प्राथमिक
गट
अंगणवाडी
कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका
२.प्राथमिक
शिक्षक व मुख्याध्यापक गट
उपशिक्षक, पदवीधरशिक्षक , प्राथमिक
मुख्याध्यापक
३.माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट
माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक
शिक्षक, मुख्याध्यापक
४.विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट
विषय सहाय्यक, विषय साधन
व्यक्ती
५.अध्यापकाचार्य
व पर्यवेक्षकीय अधिकारी गट
केंद्रप्रमुख ते
शिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता,वरिष्ठ अधिव्याख्याता
या पाचही गटातील विविध
स्पर्धकांनी यावर्षी भरपूर प्रतिसाद नोंदवला.
यामध्ये पाचही गटातील
स्पर्धकांची पहिली फेरी आणि सादरीकरण जिल्हास्तर / विभाग स्तर नुकतेच पार पडले
आहे.
ज्या स्पर्धकांनी ७५ टक्क्या पेक्षा जास्त गुण
मिळवले असे स्पर्धक राज्य स्तर फेरी साठी पात्र ठरले.
यातील प्रत्येक ( पाचही )
गटातील टाॅप टेन ( सर्वोच्च गुण मिळवणारे ) स्पर्धक निवडले जातात आणि त्यांची
अंतिम राज्यस्तरीय सादरीकरण फेरी होते
या अंतिम राज्यस्तरीय सादरीकरण फेरीसाठी यावर्षी ज्या स्पर्धकांची निवड झाली आहे त्या स्पर्धकांची यादी येथे दिलेली आहे.
राज्यस्तरीय सादरीकरणा करिता सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेछ्या.

0 Comments