सध्याच्या कोविड 19 च्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा पुढील वर्गातील प्रवेश व ईतर
मूल्यमापनासाठी स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थ्यांचा
सहभाग याचा- मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोग होऊ शकतो.
याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना जाणीव होणे अपेक्षित आहे. एकदा नोंदणी
केल्यावर पुन्हा पुन्हा नोंदणीची आवश्यकता नाही.
स्वाध्याय उपक्रमामध्ये आत्ताच नोंदणीसाठी व स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.
स्वाध्याय उपक्रमामध्ये सहभाग कसा घ्यावा ह्याचा डेमो व्हीडीओ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
राज्यातील पहिली
ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून 'स्वाध्याय' (डिजिटल होम
असेसमेंट योजना) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून पहिली ते
दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा)
पाठवण्यात येईल, तर त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि
पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील.
कोविड १९- करोनामुळे
शाळा काही महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि
त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एका
स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यग्र राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे
म्हणजेच त्यांच्या पालकांकडे 'स्मार्ट फोन' नाहीत, तेही या उपक्रमात
सहभागी होऊ शकतात. हा 'स्वाध्याय' चा सर्वांत मोठा
फायदा आहे.
राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने
स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उपक्रमाचे
उद्घाटन करून, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे
कार्यक्रम व उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.
अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, 'एससीईआरटी'चे संचालक डॉ.
दिनकर पाटील, विकास गरड आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून
राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर
देण्यात येईल. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि
गणिताचे विषय सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले
जाईल असे सांगितले आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत
साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी स्वाध्याय हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे, असे शालेय शिक्षण
विभागाकडून सांगण्यात आलेले आहे .
स्वाध्याय उपक्रम कोणासाठी?
1 Comments
Ajit pande
ReplyDelete