केंद्रप्रमुख निकालाची गुणपडताळणी Response Sheet लवकरच
उमेदवारास उपलब्ध होणार.तसेच उमेदवाराची tet/ctet माहिती मागवली
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित
विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ चा निकाल नुकताच घोषित झाला आहे. या समूह साधन
केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ ची
परीक्षार्थी शिक्षकांना आपल्या मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी करण्यासाठी आणि आपण online परीक्षेत
परीक्षा सेंटर वर संगणकात जे उत्तर नोंदवलेले आहे ते पाहण्यासठी Response Sheet उपलबध होणार
आहे. त्यासाठी उमेदवारास परीक्षा परिषदेच्या मुख्य संकेतस्थळावर जावून दिलेली लिंक
भरणे आवश्यक आहे. सोबत दिलेली माहिती अत्यंत काळजीपूर्वक वाचून इंग्रजीत भरावी.
1) खालील दिलेली माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
3) पुनर्मूल्यांकन फी प्रति विषय ५००/- रुपये आहे.
परीक्षा परिषदेच्या मुख्य संकेतस्थळावर
जावून दिलेली लिंक भरण्खायासाठी खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
1) यामध्ये माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा - 04 प्रसिद्धी निवेदन दिले आहे त्यामध्ये खालील बाबी नमूद आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५९ परीक्षार्थी उपस्थित होते.
सदर परीक्षेचा निकाल आज दि. १३/०३/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)/CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती
या लिंक मध्ये भरण्याकरीता दिनांक १६.०३.२०२६ ते २१.०३.२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांमार्फत सदर माहिती भरण्याची मुदत वाढविणेबाबतची विनंती लक्षात घेता माहिती भरण्याकरीता दिनांक २२.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४. यांच्या स्वाक्षरीने सदर प्रसिद्धी निवेदन दिनांक २०/०३/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे च्या मुख्य वेबसाईट वर प्रकाशित झालेले आहे.
....
0 Comments