जिल्हा परिषद
क्रीडा स्पर्धा आता विभाग व राज्यस्तरावर- क्रीडा शिक्षकांमध्ये
आनंदाचे वातावरण
ग्रामविकास, विभागाच्या विविध विषयांबाबत मा. मंत्री
(ग्रामविकास व पंचायत राज), यांच्या
अध्यक्षतेखाली दिनांक १४.०२.२०२५ रोजी आयोजित बैठकीत जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा
विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी अभ्यास करुन अहवाल करण्यासाठी क्रीडा
समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास अनुसरुन जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा
विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी तपासणी व अभ्यास करुन अहवाल सादर
करण्यासाठी क्रीडा समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीच्या
अध्यक्षांना आवश्यकतेनुसार विभागीय/जिल्हास्तरावरील क्षेत्रिय कार्यालयातील
अधिकारी यांना बैठकीस आमंत्रित करता येणार आहे. सदर समितीची कार्यकक्षेनुसार जिल्हा
परिषद क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी आवश्यकता व त्याची
कारणमीमांसा स्पष्ट केली जाईल. समितीने धोरण ठरवितांना शासनाच्या इतर विभागांतर्गत
चालणाऱ्या (उदा. महसुल विभाग व गृह विभाग) यांच्या क्रीडा स्पर्धाविषयी माहिती
घेवून स्पर्धा कशा असतील, त्याची रुपरेषा ठरवली जाईल. विभागीय व राज्यस्तरावर
कोणत्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असाव्यात याबाबत रुपरेषा ठरवली जाईल. क्रीडा
स्पर्धाकरीता आवश्यक निधीची उपलब्धतता कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर अहवाल दिल्या
जाईल.
एकंदर या शासन निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे.
..
0 Comments