SQAAF म्हणजे काय ? 128 मानके कोणती ? शाळेची श्रेणी कशी ठरणार ?



SQAAF म्हणजे काय ? 128 मानके कोणती ?  शाळेची श्रेणी कशी ठरणार ?

दिनांक १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णया नुसार SQAAF म्हणजे "शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा" असे नाव होते परंतु दिनांक २८ जानेवारी २०२५ च्या शासन निर्णया नुसार SQAAF म्हणजे "शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा" असे नवीन सुधारित नाव आहे.

इंग्रजीत यालाच आता SCHOOL QUALITY ASSESMENT AND ASSURANCE FRAMEWORK (SQAAF) असे म्हणतात.

यात एकूण १२८ मानकांची माहिती भरून तपासली जाते त्यानुसार शाळेचे मूल्यांकन व श्रेणी निश्चित होणार आहे

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा १ ते १२८ मानके खालीलप्रमाणे

1. १.१.१ मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज १ आणि NCERT, SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत.

2. १.१.२ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहेत.

3. १.१.३ शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशाख अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळेतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते,

4. १.१.४ शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते.

5. १.२.१ शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध "अध्यापन-शिक्षण पद्धती/शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे.

6. १.२.२ शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन 'निष्पत्तींचा अवलंब करीत आहे.

7. १.२.३ शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंवज्ञानाचा वापर करते,

8. १.२.४ शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो.

9. १.२.५ शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

10. १.३.१ शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते..

11. १.३.२ शाळा सर्व विद्याथ्याँमध्ये स्तर निहाय डिजिटल, आर्थिक, संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते.

12. १.३.३ शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांच्या माध्यमाने इंटर्नशिप, दप्तर विना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करते.

१३ 13. १.३.४ शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते.

14. १.३.५ शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करते. उदा. आयटी, अटल टिंकरिंग लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ३-डी प्रिंटिंग, आयओटी, तंत्रज्ञान, डेटा अनॅलिटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसायिक बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्चुअल रियालिटी, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, रोबोटिक्स इत्यादी.

15. १.३.६ शाळा स्थानिक 'लोकविद्ये' चा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबींबद्दल परिचय करून देते.

16. १.३.७ शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक/ स्थानिक कलाकार/पालक/संयुक्त विषय मंडळे किंवा शेजारच्या शाळा/ऑनलाईन क्लासेससह क्लब यांच्या मदतीने कोणत्याही एका कला क्षेत्रात किंवा क्षेत्रांच्या संयोजनात प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते. (उदा-लोककला, रेखाचित्र आणि चिचकला, नृत्य, संगीत, साहित्य आणि कविता, थिएटर, ग्राफिक डिझायनिंग, अॅनिमेशन इ.)

17. १.४.१ विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्याची आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे.

18. १.४.२ शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते.

19. १.४.३ शाळेतील सर्व मुलांची तपासणी (screening) प्रशस्थ अँपवर १९) (PRASHASHT App) केली जाते (PRASHASHT App अपंगत्व तपासण्यासाठी NCERT ने विकसित केले आहे.)

20. १.५.१ शाळा काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरणात मूल्ये वृद्धिंगत करते. विविश्वतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकांत सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते.

21. १.५.२: शाळा वर्गातील आंतरक्रियांमध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता आणि मुल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्यांची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करते.

22. १.६.१ विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध पद्धती वापरतात.

23. १.६.२ सहयोगी आणि स्व-मूल्यांकन तंव समजून एकात्मिकरण केले आहे.

24. १.६.३ अध्ययनाचे मुल्यांकन करण्यासाठी क्षमता / अध्ययन निष्पत्ती या श्रेणी स्तर म्हणून वापरतात. राष्ट्रीय अविष्कार अभियानात विज्ञान आणि गणित शिक्षण आनंददायी व अर्थपूर्ण बनविण्यासाठी कृती एकत्रित केल्या आहेत.

25. १.६.४ प्रत्येक मुलासाठी समग्र प्रगती पत्रक तयार केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर बाटचाल करतात.

26. १.६.५ SLAS/PAT/NAS/SEAS च्या जिल्हा अहवालावर आधारित कृती उपक्रम निर्धारित केले आहेत.

27. १.६.६ शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम / अधिकाधिक उपस्थिती सुनिश्चित करते.

28. १.६.७ PAT च्या आहवालावर आधारित कृती उपक्रम निर्धारित केले आहेत.

29. १.७.१ शाळेमध्ये पायाभूत तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी एक ते तीन वर्षाचे बालवाटिका शिक्षण आहे.

30. १.७.२ वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आहे.

31. १.७.३ शाळा मातृभाषा/प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक ३१ भाषेच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्यांची जोपासना करतात.

32. १.७.४ शाळांनी पायाभूत स्तरावरील पाच वर्षासाठी नवोपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त अध्यापनचा स्वीकार केला आहे.

33. १.७.५ प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी, इयत्ता पहिली व दूसरी मध्ये शाळा निरीक्षण-आश्वारित मूल्यमापन करते.

34. १.७.६ इयत्ता तिसरी पर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा FLN कृतींचे बारकाईने निरीक्षण करते.

35. १.७.७ समृद्ध अध्ययन अनुभवासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपापसातील भेटींचे आयोजन केले जाते.

36. १.८.१ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि ३६ भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरणसाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात.

37. १.९.१ शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन आणि अध्यापन, अध्ययन-अध्यापन साधनांचा विकास (TLM), आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्रांशी संबंधित नवीन विषय घटक इत्यादींमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतात.

38. १.१०.१ शिक्षक विद्याध्यर्थ्यांना चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या-निराकरण कौशल्ये आणि डिझाइन थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक-आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात.

39. १.१०.२ माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या एकविसाव्या शतकातील कौशल्यांमध्ये शिकणारे विद्यार्थी निष्णात आहेत.

40. १.११.१ शाळा नागरिकत्व कौशल्ये, संविधानातील मूल्ये आणि मूलभूत कर्तव्यांबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते.

41. १.११.२ शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरांवर समाविष्ट करते.

42. १.११.३ शाळा वर्तमान घडामोडींची जागरूकता आणि समज तसेच ४२ स्थानिक समुदाय, राज्ये, देश आणि जग सामोरे जात असलेल्या गंभीर समस्यांचे ज्ञान सुनिश्चित करते.

43. १.१२.१ शिक्षक आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इ. बाबत अद्यययावत राहतात.

44. १.१२.२ शिक्षक विविश्व स्तरावर अभ्यासक्रम, उपक्रम निर्मिती, मोड्यूल निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात.

45. २.१.१ शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्गखोल्या आहेत आणि शाळेने एका ४५ सवात विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

46. २.१.२ शाळेत मुले, मुली, ट्रान्स जेन्डर व CWSN यांचेसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहासाठी मुबलक पाणी उपलब्ध असून सर्व स्वच्छतागृहे वापरण्यास योग्य आहेत.

47. २.१.३ शाळेत ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे. नसेल तर समाज सहभाग इतर संस्थेकडील ग्रंथालय / शेजारील ग्रंथालयांचा वापर करतात.

48. २.१.४ भाषा/गणित / विज्ञान इ. विषयासाठी अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे

49. २.१.५ शाळा आणि शालेय व्यवस्थापन यांना साह्यभूत होण्यासाठी संगणक व ICT सुविधेचा वापर केला जातो.

50. २.१.६ कला, शिल्पकला, नृत्य, नाट्य, विविध मंडळे / क्लब यासाठी शाळेत पुरेशी जागा / खोल्या आहेत.

51. २.२.१ शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य/मुख्याध्यापक, कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे.

52. २.३.१ विद्याव्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधी शाळेला जाणीव असून आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहेत.

53. २.४.२ शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी आणि पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत.

54. २.४.२ शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी आणि पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत...

55. २.५.१ शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित, आरामदायक वयोमानानुसार आणि आकर्षक रचना केलेले फर्निचर आहे.

५६/56. २.६.१ शाळेमध्ये प्रकाश आणि वायुवीजन व्यवस्था आहे.

५७/57. २.६.२ शाळेत अग्निस्रक्षा उपाययोजना केल्या आहेत.

58. २.६.३ आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. ५८ शाळेची स्वतःची आपत्तीकालीन सज्जता योजना आहे व प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केली आहे.

59. २.७.२ शाळा ऊर्जा बचतीसाठी LED प्रकाश/सौरऊर्जेचा वापर, टाकाऊ ५९ वस्तूचे व्यवस्थापन/पुनर्वापर, जल पुनर्भरण व प्लॅस्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते.

60. २.७.२ शाळा ऊर्जा बचतीसाठी LED प्रकाश/सौरऊर्जेचा वापर, टाकाऊ वस्तूचे व्यवस्थापन/पुनर्वापर, जल पुनर्भरण व प्लॅस्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते.

61. २.७.३ शाळेकडे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी स्वतंत्र ६१ स्वयंपाकगृह असून परसबाग / किचन गार्डन मधील सेंद्रीय / नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाल्याचा वापर करतात.

62. २.८.१ विद्यार्थ्यांमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर खेळ, योग, व्यायामविषयक जाणीव असून यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत. दिव्यांगासाठी स्वतंत्र सोय आहे.

63. २.९.१ निवासी शाळेत पुरेशा खोल्या/वसतिगृहे, मनोरंजनाची जागा, शौचालये, पिण्याचे पाणी ठिकाण, वार्डन, कर्मचारी निवासस्थान, अभ्यांगत खोली, कपडे धुण्याची खोली, धान्यकोठी, कॉमन रूम, अतिरिक्त खोली उपलब्ध आहे.

 64. २.९.२ मुलींच्या वसतिगृहामध्ये Sanitary Pad, Vending Machine, Incinerator सुविधा उपलब्ध असून स्वच्छता संस्कृती जोपासली जाते.

65. २.९.३ शाळा निवासी सुविधांमध्ये विद्याथ्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा निश्चित करते,

 66. २.९.४ शाळा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व बौद्धिक विकासासाठी विविश्व उपक्रमाचे आयोजन करते.

67. २.१०.१ शाळेत स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षिततेच्या निकषाचे पालन करणारे उपाहारगृह/स्वयंपाकगृह आहे.

68. २.११.२ शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल (इंटरनेट) सुविधा उपलब्ध आहे

69. २.११.२ शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल (इंटरनेट) सुविश्वा उपलब्ध आहे

70. २.१२.१ शाळेने शिक्षकाकडून सर्वेक्षण करून दाखलपात्र सर्व विद्यार्थांचे विशेषतः सामाजिक, आर्थिक, वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी केली आहे.

71. २.१२.२ शाळा सर्व इयत्तामध्ये शून्य गळतीदर आणि १००% संक्रमण दर राखते.

72. २.१२.३ शाळा सर्व शिक्षण स्तरातील सर्व विध्यार्थ्यांना शाळेत किंवा जवळच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देते.

73. २.१२.४ माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते.

74. २.१२.५ शाळेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्यांचा शालेय विकासात उपयोग करून घेतला आहे.

75. ३.१.१ शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी शाळेच्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी शाळेत शासनाने निर्देशित केलेल्या निकषानुसार पुरेसे पाव आणि सक्षम कर्मचारी आहेत.

76. ३.१.२ शाळेमधील नवनियुक्त कर्मचारी / कर्मचारी यांचा राज्य / जिल्हा तालुका / केंद्र स्तरावरील उदबोधन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात.

77. ३.१.३ शाळा / केंद्र / तालुका स्तरावर कर्मचायांचे मूल्यांकन केले जाते.

78. ३.१.४ शाळा CRC/BRC/DIET / प्रादेशिक कार्यालयाशी सल्लामसलत करून, कर्मचारी विकास कार्यक्रम आणि शिक्षकांची क्षमता वाढवते.

79. ३.१.५ शाळा त्यांच्या नाविन्यपूर्ण / प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची ओळख आणि प्रशंसा प्रदान करते.

80. ३.१.६ शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या सदुपदेशानासाठी चांगली विकसित यंत्रणा आहे. (Online / Offline)

81. ३.२.१ मुख्याध्यापक यांचेकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरिता स्पष्ट दृष्टी ८१ आणि दिशा आहे.

1282. ३.३.१ मुख्याध्यापक शाळा विकास घडवून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसंबंध प्रस्थापित करतात.

83. ३.४.१. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी मिळून ८३ चालू असलेल्या बदलांचे मार्गदर्शन करणारी परिवर्तनात्मक भूमिका विकसित करतात आणि नियमितपणे पुनर्विलोकन करतात.

84. ३.५.१. SCERT / DIET अशा व्यावसायिक विकास संस्थांच्या सहाय्याने शिक्षक, क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात.

८५ 85. ३.५.२. शाळेच्या एकूण उपलब्ध वेळेपैकी शिक्षकांकडे अध्यापनाकरिता वापरलेल्या वेळेची टक्केवारी / प्रमाण.

86. ३.५.३ शिक्षकांचे वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय,

87. ४.१.१ शाळा दिव्यांग आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने (रॅम्प, हँड्रील, अपंगासाठी अनुकूल शौचालय) अडथळा मुक्त प्रवेश प्रदान करते.

88. ४.१.२ शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळा मुक्त प्रवेश प्रदान करते.

89. ४.१.३ शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या आणि मूल्यमापनाबाबतीत अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते.

90. ४.१.४ दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळा विरहित शिक्षण घेणेसाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरविली जातात.

'इतर मनोरंजनाच्या सुविधा पुरविते. 91. ४.२.१ शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरेशा बैठे आणि मैदानी खेळ तसेच

92. 4.३.१ शाळा दिव्यांगाना पुरेशी वाहतूक सुविधा पुरवते. (मानकानुसार वाहतूक सुविधा पुरविणाऱ्या शाळांच्या बाबतीत)

93 १३. ४.५.१ शाळा विद्यार्थी सव्र्व्हेक्षणाद्वारे शाळाबाह्य बालकांचा मागोवा घेते.

94. ४.५.१ शाळा विद्यार्थी सव्र्व्हेक्षणाद्वारे शाळाबाह्य बालकांचा मागोवा घेते.

95. ४.६.१ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक / प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि शाळा त्यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करते.

96. ४.७.१ विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, कला, कीडा इत्यादी क्षेत्रातील विविध 'सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतील प्रतिभावान मुलांना शाळा मार्गदर्शन करते.

97. ४.८.१ शाळा शिक्षकांना मातृभाषा / स्थानिक / बोली भाषेत शिकविण्याचे शैक्षणिक साहित्य प्रविते.

98. ४.९.१. शाळा नियमितपणे दिव्यांगत्वासाठी शालेय, केंद्र व तालुका स्तरावर तपासणी शिबीरात सहभाग व आयोजन करते.

99. ४.१०.१ शाळा मुलीना भेदभाव विरहित क्रीडा, STEAM संधी, कलाशिक्षण, व्यवसायिक शिक्षण व संरक्षण प्रशिक्षण इत्यादी प्रदान करते तसेच संक्रमणाचा मागोवा घेऊन पुढील शिक्षणाची संधी देते.

100. ४.११.१ शाळा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या (SEDGS) सर्व स्तरांवरील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा करते.

101. करते. ५.१.१ शाळा दृष्टी व ध्येय विधान आणि मानकानुसार कार्य

102. ५.२.१ शालेय अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन है संस्थात्मक नियोजनाच्या दृष्टी आणि ध्येय विधानाशी सुसंगत आहे..

103. ५.३.१ शालेय नेतृत्व / व्यवस्थापन हे शाळा आणि शाळेबाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते.

105. ५.४.२ संसाधनांचा अपव्यय कमी करण्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर सनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे.

५.४.१ स्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे.

५.५.१ शालेय संबंध व्यवस्थापनासाठी एक औपचारिक यंत्रणा आहे.

107. आहे. ५.५.२ शाळेचा प्रति बालक खर्च योग्य आणि परिणामकारक

108. उपलब्ध आहे. ५.६.१ शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमांची व्यवस्थापन यंत्रणा

109. ५.७.१ शाळेमध्ये माहिती आणि अभिलेखे देखभाल करण्याची परिपूर्ण प्रणाली आहे.

110. ५.८.१ नियमित आणि प्रभावी मौखिक / आभासी /ऑनलाईन / लिखित संप्रेषण प्रणाली अस्तित्वात असून कार्यरत आहे.

111. ५.९.१ शाळेकडे दस्तऐवज ठेवणे, ताळेबंद, लेखापरीक्षण 'यासह वित्तीय व शुल्क नियमनासाठी यंत्रणा कार्यरत आहे.

112. ५.१०.१ शाळा प्रवेश धोरण आणि प्रक्रिया ही भेदभावरहित, तर्कसंगत, पारदर्शक आणि प्रचलित मार्गदर्शक तत्वे, आर. टी.ई. २००९ मार्गदर्शक तत्वे आणि निकषांशी सुसंगत आहे.

113. ५.१०.२ SC/ST/OBC/ अल्पसंख्यांक यांसारख्या वंचित समुदायांवर व शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून जवळपासच्या भागात नियमित प्रवेश प्रक्रियेचे अवलंबन करते.

114. ५.११.१ शाळा संकुल,

115. ५.११.२ शाळा प्रमुख शाळेतील प्रणाली सुधारण्याची क्षमता प्रदर्शित करतात आणि जबाबदारी व उत्तरदायित्वाची नैतिकता सुनिश्चित करतात.

116. ५.११.३ शाळा प्रमुख विद्यार्थ्यांना व शाळेला एकविसाव्या शतकातील कौशल्यांनी सज्ज करतील अशा सर्जनशील पद्धती व तंत्रांची ओळख करून देऊन नाविण्यतेला प्रोत्साहित करतात.

117. ६.१.१ शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मते व सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधीउपलब्ध करून देते.

118. ६.१.१ शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मते व सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधीउपलब्ध करून देते.

119. तयार करते. ६.१.२ शाळा आनंददायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण

120. ६.१.३ विद्यार्थी नियमितपणे शालेय सुरक्षा, पाणी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता (सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन इ.) इत्यादींचा लेखाजोखा मांडण्याच्या व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो.

121. ६.१.४ अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, विविध उपक्रम, भौतिक सोयी सुविधाबद्दल समाधानी आहेत.

122. ६.२.१ शाळा शिक्षकांना त्यांचा अभिप्राय देण्यासाठी निर्घोक, भयमुक्त आणि काळजी घेणारे वातावरण तयार करते आणि या अभिप्रायाचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी आणि शिक्षकांच्या सुधारणा, नियोजन आणि मूल्यांकन यासाठीची यंत्रणा विकसित करते.

123. ६.२.२ शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण नोंदणी योजना, पुरस्कार व इतर कृतीबाबत शिक्षक समाधानी आहेत.

124. ६.३.१ शाळा कार्यालयीन कर्मचायांना सुधारणाविषयक त्यांचे मत, सूचना व्यक्त करण्याची संधी देते.

125. ६.४.१ शाळा व्यवस्थापन समिती, प्रशासकीय विभाग, शिक्षणसंस्था, व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना, विचार आणि चिंता व्यक्त करण्यासाठी एक कार्यप्रणाली प्रदान करतात आणि सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन व मूल्यांकन करतात.

126. ६.५.१ शाळा पालकांचे, माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय

127. घेते त्यानुसार शालेय कार्यक्षमतेत सुधारणा आणि त्यांच्या समाधानाचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते.

128. ६.७.१ व्यवस्थापन, शिक्षक पालक संघ (P.T.A.), शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन विकास समितीचे पदाधिकारी शाळेच्या VISION व MISSION यांचे पुनरावलोकन करून मूल्यांकन व सतत सुधारणा करण्याची कार्यप्रणाली विकसित करते.

प्राप्त गुणावर आधारित  खालीलप्रमाणे श्रेणी निश्चित होईल
श्रेणी अ + प्राप्त गुण ९१ ते १०० टक्के  
श्रेणी अ    प्राप्त गुण ८१ ते ९० टक्के
श्रेणी ब + प्राप्त गुण ७१ ते ८० टक्के
श्रेणी ब    प्राप्त गुण ६१ ते ७० टक्के
श्रेणी क + प्राप्त गुण ५१ ते ६० टक्के
श्रेणी क     प्राप्त गुण ५० टक्के पेक्षा कमी

Post a Comment

0 Comments