सराव प्रश्नसंच-75-1- केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा, शिक्षण विस्तार अधिकारी स्पर्धा परीक्षा व MAHATET EXAM
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी " केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३ " या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. ०६/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान , विशेष करून इंग्रजी विषयज्ञान (MAHATET EXAM आणि केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा,शिक्षण विस्तार अधिकारी स्पर्धा परीक्षा चा या घटका वरील SYLLABUS साधर्म्य असल्याने )
या परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी व्हावी म्हणून इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र / अध्यापनशास्र, गणित, व परिसर अभ्यास या प्रत्येक विषयावर येथे सरावासाठी 10 गुणांचे प्रश्नसंच खालील लिंकवर उपलब्ध केलेले आहेत आपण जास्तीत जास्त सराव करावा व भरपूर यश मिळवावे करिता शुभेच्छा- सराव पेपर- सोडवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या पेपर वर क्लिक करा
मराठी भाषा | इंग्रजी भाषा | बालमानस शास्र अध्यापन शास्र | गणित | परिसर अभ्यास |
परीक्षेसाठी विभाग २=१०० गुणांसाठी उपघटकांचे स्वरुप :
उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)
(ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण,बलस्थाने व अडचणी
क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती
इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
उपघटक २ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA,SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषण
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
फ) निकालासंबंधीची कामे
उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
(ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने
उपघटक ६ विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
क) क्रीडा विषयक घडामोडी,
0 Comments