HSC EXAM 2023 TIME TABLE, इयत्ता 12 वी लेखी परीक्षा वेळापत्रक

 


HSC EXAM 2023 TIME TABLE, इयत्ता 12 वी लेखी परीक्षा वेळापत्रक

फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत

अ.क्र.

तपशील

लेखी परीक्षा कालावधी

1

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२३ ते सोमवार दि. २० मार्च २०२३

2

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा

गुरूवार दि. ०२ मार्च २०२३ ते शनिवार दि. २५ मार्च २०२३

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. १९.०९.२०२२ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी- मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. असे सचिव, राज्यमंडळ, पुणे ४ यांनी प्रकटनाद्वारे प्रशिद्ध केले आहे

इयत्ता बारावी HSC EXAM 2023 परीक्षा वेळापत्रक REGULAR

इयत्ता बारावी HSC EXAM 2023 परीक्षा वेळापत्रक VOC

Post a Comment

0 Comments