जिल्हापरिषद शिक्षकांना मिळणार केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती


जिल्हापरिषद शिक्षकांना मिळणार केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती

जिल्हापरिषद शाळांसाठी केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख हे पद महत्वाचे मानले जाते. मात्र बऱ्याच दिवसांपासून ह्या पदाची भरती झालेली नाही. परंतु आता आजच्या आदेशाने सहाय्यक शिक्षकांच्या केंद्रप्रमुख पदासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळणार आहे. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर पदे सरळसेवा, विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारा व पदोन्नतीद्वारे ४० : ३० : ३० या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत. तथापि तूर्त शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०१० नुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार पदोन्नतीची ३० टक्के पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणेबाबत व केंद्रप्रमुखांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरुप केंद्रप्रमुखांची जी पदे भरणे शक्य आहे ती पदे तात्काळ भरणेबाबत नुकतेच संचालनालयास आदेशित केलेले आहे. दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकीचे इतिवृत्तामधील मुद्दा क्र. २ मधील उप मुद्दा क्र. २.२ व २.४ नुसार व दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ३० टक्के च्या मर्यादित पदोन्नतीने व विषयाच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्य आहे ती रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर  करण्याचा  आदेश निर्गमित झाला आहे

Post a Comment

0 Comments