वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण महत्वाचे मुद्दे,Varishth vetan shreni v nivad shreni Online Training Important points


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण महत्वाचे मुद्दे,Varishth vetan shreni v nivad shreni Online Training Important points

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील आय. टी व प्रसारमाध्यम व समन्वय चे उपसंचालक माननीय श्री विकास गरड साहेब यांनी मुख्य वेबसाईट ला माहिती दिली आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स संदर्भातील माहितीसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागाची मुख्य वेबसाईट ला भेट द्या 


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण करिता असलेली मुख्य वेबसाईट 


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे द्वारा उद्बोधन सत्र मार्गदर्शक व्हिडीओ क्रमांक-1, दिनांक १ जून२०२२  रोजी सकाळी ११ .०० वाजता झालेल्या  उदबोधन सत्र YouTube live

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे द्वारा उद्बोधन सत्र मार्गदर्शक व्हिडीओ क्रमांक-2

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण करिता महत्वाचे सूचना सत्र व्हिडीओ

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यादी

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण अवैध ई मेल मुळे इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी न झालेल्यांची यादी 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर नोंदणी झालेले व नोंदणी न झालेल्या प्रशिक्षणार्थी यांची कारणासह जिल्हानिहाय आकडेवारी 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण तक्रार निवारण 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी पडताळणी 

मा.संचालक यांची प्रेस नोट पत्र 

असे वरील tab वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण च्या मुख्य वेबसाईट ला उपलब्ध झालेले आहेत 

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण application Infosys Springboard


वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?
वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे ?
स्वाध्याय कसा सोडवावा ?
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - चाचणी कशी सोडवावी?
 वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - अभिप्राय कसा द्यावा?  

सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास  दिनांक ०१ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्यक युजर आय.डी व  पासवर्ड प्रशिक्षनार्थ्यानी नोंदणी करताना पुरविलेल्या ई- मेलवर प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षणार्थ्याना पुरविलेल्या ई मेल आय डीवर मेल प्राप्त होणार नाही त्यांनी  https://training.scertmaha.ac.in/   या वेबसाईटवर तक्रार करण्याची सुर्विधा दि. ०३ जुन २०२२पासून सुरु होईल अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मिळेल.

सर्वप्रथम प्रशिक्षण  application Infisys Springboard ची app डाउनलोड करायची आहे.

त्यानंतर आपल्या मोबाईल ला प्रशिक्षनासंदर्भात मिळालेला लॉगिन ID व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

लॉगिन ID व पासवर्ड आल्याशिवाय चुकूनही लॉगिन करायचे नाही.

लॉगिन झाल्यानंतर temporary  पासवर्ड बदलवून स्वतःचा पासवर्ड तयार करावा.

पासवर्ड बद्दलल्यानंतर आपली प्रोफाइल update करायची आहे.

प्रोफाइल update झाल्यानंतर search ऑपशन मध्ये जाऊन प्रशिक्षण कोर्स सीलेक्ट करायचा आहे.

प्रशिक्षण कोर्स घेतल्यानंतर त्यातील एक एक module आपल्याला पूर्ण करायचे आहे.

प्रत्येक module मध्ये तीन कन्टेन्ट असेल 1- PDF 2- विडिओ 3- स्वाध्याय

दिलेल्या वेळेपेक्षा ज्यास्त वेळ घेऊन प्रत्येक module पूर्ण करायचे आहे. प्रत्येक घटकातील PDF वाचायची, video पहायचे व स्वाध्याय सोडवायचा. स्वाध्याय ऑनलाइन type करता येईल किंवा कागदावर लिहून PDF तयार करून अपलोड करता येईल.

 सर्व module -घटक-पूर्ण केल्यानंतर मूल्यमापन वर जायचे आहे.

मूल्यमापन मध्ये कमीतकमी 40% गुण घेणे गरजेचे आहे.

एकदा मूल्यमापन सुरू केले की ते मध्येच बंद करता येणार नाही. याची नोंद घ्यावी.

मूल्यमापन ची प्रक्रिया सर्व attempt session पूर्ण केल्यानंतर -finish test- वर क्लीक करावे.

मूल्यमापन झाल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे feedback,

feedback मध्ये आपलं अभिप्राय नोंदवावा.

या प्रकारे आपल्याला प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे.

या बाबत आणखी माहिती पत्रक निघणार आहे. घाई करू नये. लॉगिन ID,  पासवर्ड येऊ द्यावे.

राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यासाठी चे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक     जून २०२२  पासून सुरू होणार आहे सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वरुपामध्ये असून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना एकाच वेळी पूर्ण करता येणार आहे

राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण च्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय चाचणी सोडवून  वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे

ऑनलाईन प्रशिक्षण एकूण 50 ते 60 तासाचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३०  दिवसांचा कालावधी देण्यात येईल त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाइन स्वरूपामध्ये ३०  दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहे
तसेच पात्र प्रशिक्षणार्थींना  दिनांक १  जून २०२२ पासून  ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात सुद्धा मार्गदर्शन सत्राचे आयोजन परिषदेमार्फत केले जाणार आहे

महत्वाचे- वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण करिता असलेली मुख्य वेबसाईट ला वारंवार भेट देण्यास विसरू नका  http://training.scertmaha.ac.in/indexm.aspx



Post a Comment

0 Comments