भीमगीते- माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर | Mazi Aaji
Mhanayachi Ovi Hi Jatyavar
Song - Mazi Aaji Mhanayachi Ovi Hi Jatyavar
Lyrics by - Kiran Sonavane
Singer - Aniruddha Vankar
माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर Mazi Aaji Mhanayachi Ovi Hi Jatyavar
माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर
राही लहान्या खोलीत
केला अभ्यास रस्त्यावर
नाही खुर्ची टेबल
कधी बसला पोत्यावर
माझी आजी म्हणायची----
नाही भिमाने ठेवली
कधी सुपारी दातावर
पहा आजचे पुढारी
बसती दारू गुत्त्यावर
माझी आजी म्हणायची----
नाही राहिला विश्वास
आता एकाही नेत्यावर
बेकी करू नका किरण
तुम्हच्या पडेल पथ्यावर
माझी आजी म्हणायची----
माझी आजी म्हणायची
ओवी ही जात्यावर
भीम बनला सावली
कोटी कोटीच्या माथ्यावर
माझी आजी म्हणायची----
--------अनिरुद्ध वनकर
0 Comments