प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
इयत्ता दुसरी मराठी बालभारती संदर्भातील वर्णनात्मक नोंदी
सकारात्मक नोंदी- शब्द वाचून अर्थ सांगतो / ते स्वताचा नवीन अनुभव सांगतो / ते पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करून महिती सांगतो / ते आवडलेली कथा सांगतो / ते सांगितलेल्या गोष्टीवर आधारित चित्र रेखाटतो / ते स्वता:च्या भाषेत गाणी गातो / ते कथा सांगतो / ते कृतियुक्त गाणी गातो / ते मित्रांशी मुक्तपणे गप्पा मारतो / ते परिपाठात कृतियुक्त सहभागी घेतो / ते शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो / ते चित्र वर्णन करतो / ते प्रश्न विचारतो / ते योग्य आवाजात वाचन करतो / ते शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो / ते पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो / ते चित्रांच्या व त्याच्या नावाच्या जोड्या लावतो / ते समान जोड अक्षरांच्या जोडया लावतो / ते गटामध्ये प्रकट वाचन करतो / ते फलकावरील शब्द ओळखतो / ते गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो / ते पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो / ते स्वतःचे नाव, पत्ता व कुटुंबाविषयी माहिती सांगतो / ते स्वाध्याय सोडवतांना गरज पडेल तेथे घरातील मोठ्या माणसांची मदत घेतो / ते मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो / ते सामुहिकरित्या अभिनय सादर करतो / ते मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो / ते प्राणी, पक्षी व पानाफुलांचे चित्र काढतो / ते आपल्या दिनक्रम सांगतो / ते स्वताचे मत मांडतो / ते आवडीचे मजकुराचे वाचन करतो / ते आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो / ते चित्रकथा वाचतो / ते कविता अभिनयासह सादर करतो / ते बडबड गीताचे गायन समूहात करतो / ते ध्वनिमधील साम्यवाद ओळखतो / ते आकृतीमध्ये योग्य रंग भरतो / ते आकृतीमधील साम्यभेद ओळखतो / ते सुचनेप्रमाणे शब्द लिहितो / ते श्रुतलेखन करतो / ते शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो / ते नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो / ते वर्ग मित्रांशी संवाद करतो / ते स्वताला आवडणारी गोष्ट स्वताच्या शब्दात सांगतो / ते खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो / ते स्वताचे अनुभव वर्गात सांगतो / ते स्वताच्या भावना, विचार व अनुभव व्यक्त करतो / ते परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो / ते प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो / ते आवाजातील साम्यभेद ओळखतो / ते दिलेल्या चित्रातील आकार भेद ओळखतो / ते शब्दाचे प्रकट वाचन करतो / ते शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो / ते चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो /ते संवादाचे अभिनयासह सादरीकरण करतो /ते प्रकल्प सुंदररीत्या सादर करतो /ते वर्णनात्मक निबंध सुंदर लेखन करतो /ते प्रकल्पसाठी साहित्य सुंदररित्या जमा करतो /ते चाचणी सुंदर रित्या लिहितो /ते मुद्दयांच्या आधारे कथा तयार करून सांगतो /ते चाचणी वेळेत अचूक स्वच्छ प्रकारे लिहितो /ते चित्रे पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो /ते चाचणीतील उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहितो /ते मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो /ते शालेय उपक्रमात सतत सहभागी असतो /ते बडबडगीत तालासुरात सादर करतो /ते वहीवर पेन्सिल च्या सहाय्याने मुळाक्षरे गिरवतो / ते चौदाखडी चे सुस्पष्ट वाचन करतो / ते वाचनपाठ मधील एक एक ओळ सुस्पष्ट वाचतो / ते शब्द तयार करतो व वाचन करतो / ते निरीक्षण करतो व माहिती सांगतो / ते कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो /ते |
अडथळ्याच्या नोंदी- बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो / ते सुचविलेले प्रसंग सांगतांना अडखळतो / ते सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण अडखळत करतो / ते सुचविलेला मजकूर लिहितांना चुका करतो / ते कथा ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते शब्द लक्षपूर्वक ऐकत नाही दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो / ते दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही सहजपणे भाषण करता येत नाही बोली भाषेत प्रमाण भाषा वापरात नाही बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो / ते मोठ्यांचा मान ठेवतांना चुकीचे शब्द वापरतो / ते स्वताच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही शब्द व वाक्य चुकीचे वापरतो / ते प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही अपूर्ण वाक्य ऐकतो परंतु वाक्य पूर्ण करता येत नाही संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो / ते मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही दिलेल्या सूचना समजून घेत नाही सुचवलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो / ते सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो / ते सुचविलेले भाग वाचन करताना अडखळतो / ते सुचविलेले भाग वाचताना शब्दोचार अशुद्ध करतो / ते सुचविलेला पाठ्य भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो / ते दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही |
0 Comments