स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम

 

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आवेदनपत्र,ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित  स्वच्छ विद्यालय पुरस्कार संदर्भात ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रमाचे दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26, व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा यासाठी नामांकन करण्यासाठीचे निकष, प्रक्रिया, पडताळणी यासंदर्भात उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची you tube माध्यमाद्वारे पुढील प्रमाणे,

या उद्बोधन कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे व आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे  एम डी सिंह संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व  प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आवेदनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे, आपल्या शाळेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती खाली दिली आहे

स्वच्छ विद्यालय पुरस्कार संदर्भात माहिती इंग्रजीमध्ये

स्वच्छ विद्यालय पुरस्कार संदर्भात माहिती मराठीमध्ये

Post a Comment

0 Comments