गोधडी -कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 38, कविता व MCQ स्वाध्याय

गोधडी -कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती  - पृष्ठ क्र 38, कविता व MCQ स्वाध्याय

गोधडी- कविता - कवी डॉ कैलास दौंड  - या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,

कवितेचा अर्थ -

गोधडी म्हणजे कवेळ पांघरुण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय संसारात आई आणि बाबा दोन्ही व्यक्तिच्या समन्वयाने, संगतीने सर्व गोष्टी घडत असतात सुखात-दुःखात दोघांनी सोबत राहून समोरे जावे लागते म्हणून प्रस्तुत ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे संकटाच्या वेळी संसाररुपी गोधडीला टिकवून ठेवण्यासाठी आई आपल्या फाटक्या लुगड्याच्या अस्तराप्रमाणे कार्य करते म्हणजे आपल्या फाटक्या संसाराला शिवण्याचे काम आई करत असते तसेच आईच्या फाटक्या लुगड्याच्या अस्तराला सोबती म्हणून बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर लावले असते जेणेकरून गोधडी जास्त काळ टिकून राहील गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गोधडीच्या रुपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे गोधडी हे केवळ पांघरुण नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर कुंकर घालणाऱ्या प्रेमाची ऊब असते ज्यामुळे आपल्याला बाहेरची थंडी जाणवत नाही आईने अनेक चिंध्या दाटीवाटीनं बसवून गोधडीला तयार केलेल असते त्यात बाबांनी आपल्या फाटक्या धोतराचे अस्तर लावलेले असते गोधडी म्हणजे फक्त चिंध्याचे गाठोडे नसून आई वडीलांच्या त्यागाची एक आठवण असते

स्वाध्याय-

आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck

आमच्या  टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments