असा रंगारी श्रावण - कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र-24, कविता व MCQ स्वाध्याय
असा रंगारी श्रावण - कवी ऐश्वर्य पाटेकर- या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,
कवितेचा अर्थ-
श्रावण महिना म्हणजे जणू विविध रंगांची उधळण म्हणूनच कवी म्हणतात, हा रंगारी आहे विविध रंग उधळीत येतो हा चित्रकार आहे, जिकडेतिकडे हिरवे देखावे रेखाटतो संपूर्ण सृष्टी हिरवी दिसू लागते हा श्रावण महिना म्हणजे एक उत्तम कलाकारच ! ठिकठिकाणी त्याने अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत असे वाटते जणू विविध चित्रांची पंगतच मांडली आहे हा श्रावण महिना म्हणजे पावसाचा महिना. याची मैत्री, डोंगर, दऱ्या आणि नदीशी ! म्हणून हा दऱ्या डोंगरात नाचतो आणि नदीसोबत झिम्मा खेळतो याची रिमझिम सर जेव्हा पडते तेव्हा असं वाटतं जणू तो झाडांसोबत गाणेच गातो आहे ! हा श्रावण म्हणजे नटखटच ! झाडांच्या आधाराने अनेक वेली वळणावळणांनी उंचच उंच वाढू लागतात कवी म्हणतो की, हा श्रावण जणू त्यांच्या वेण्याच घालतो एकमेकांत त्यांना गुंफतो मग या वेली पोरींसारख्या लाजतात झाडामागे अधून-मधून लपतात वेलींवर पाने-फुले आली आणि वरुन पावसाच्या थेंबानी सजावटीत भरच घातली असे सुशोभित पानाफुलांचे पातळ त्या वेली नेसतात श्रावणात माहेरवाशिणी मुली व इतरही मुली झाडांना झोपाळे बांधातात गाणी गातात हे सगळे श्रावणच करतो, असे कवीला वाटते श्रावणात पावसाच्या सरींमध्ये मुलांचाही खेळ रंगतो तेव्हा मुलांसोबत हा श्रावण खेळगडी होतो जन्माष्टमीला दहीहंडी खेळायला पावसात सगळे गोपाळ चिंब ओले होतात श्रावण महिना म्हणजे उन-पावसाचा खेळ हा श्रावण या पावसाचं घर उन्हात बांधतो अशा खोड्या करुन हा खोडकर श्रावण स्वतः झाडामागे लपून बसतो ऊन-पावसात आकाशात इंद्रधनुष्य दिसते अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्याचा जणू बांध तो आकाशाला घालतो रानावनात विविधरंगी फुले फुलतात असे वाटते रंगीबेरंगी फुलांची नक्षी हा श्रावण रानात गोंदतो -रेखाटतो असा हा रंग उधळणारा श्रावण जेव्हा येतो, तेव्हा या हिरव्यागार सृष्टीच्या मळ्यात-शेतात स्वतःचे छोटे घर करुन राहतो
स्वाध्याय -
आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या Submit निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी View Score अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck
आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments