स्वाध्याय पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भेटीला
गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा दिनांक १७ जुलै
२०२१ वार - शनिवार पासून इयत्ता २ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात स्वाध्याय उपक्रम पुन्हा एकदा सुरु
झाला आहे.
ज्याप्रमाणे सेतू अभ्यासक्रम Bridge Course मागील इयत्तेच्या घटकांवर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचे ४ आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत.
१- सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याचा स्वाध्याय मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये
सेव्ह करून घ्यावा नंतर खाली दिलेली आपल्या
जिल्ह्याची लिंक क्लिक करावी नंतर आपल्या स्वाध्याय
मोबाईल मधील Whatsapp वर -नमस्ते किंवा -Hello असा मेसेज आपोआप येतो तो फक्त फॉरवर्ड केला / पाठवला की स्वाध्याय
प्रणालीची सुरुवात होते
२- आपण नवीन
विद्यार्थी असाल तर- वरील क्रमांक १ ची प्रक्रिया पूर्ण केल्यावर
स्वाध्याय ची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव,
इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक -ही सगळी माहिती अचूक आणि स्वाध्याय
सोडवण्यास सुरुवात करावी
३- आपण गतवर्षी स्वाध्याय सोडवलेला असेल तर - वरील क्रमांक १ ची प्रक्रिया पूर्ण केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल -शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली वर्ग- इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन
शाळेचा योग्य UDISE क्रमांक -स्कूल
कोड नमूद करावा आणि स्वाध्याय
सोडवण्यास सुरुवात करावी
येथे आपल्या जिल्ह्याच्या नावा अगोदरचा मोबाईल नंबर आपल्या Whatsapp असलेल्या मोबाईल मध्ये सेव्ह करावा नंतरच आपल्या जिल्ह्यासमोरील लिंक ला क्लिक करावे आणि वरील क्रमांक १ आणि २ किंवा १ आणि ३ ची कृती करा
मो क्र-8595524417 अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ
मो क्र-8595524418 भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
मो क्र-8595524419 औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी
मो क्र-8595524517 अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशीक
मो क्र-8595524518 मुंबई, मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागीरी, सिंधुदुर्ग, ठाणे
मो क्र-8595524519 कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
0 Comments