लोकराज्य मासिक - एप्रिल-2021
महाराष्ट्रातील- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड ), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकाला तब्बल सात दशकांची यशस्वी परंपरा लाभली आहे. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक राज्याचा जडणघडीचा बोलका साक्षीदार ठरलेले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणजे लोकराज्य. विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती यामुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची( mpsc, upsc व अन्य नोकरीला लागण्यासाठी आवश्यक परीक्षांसाठी ) तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यामुळेच लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे. मराठी लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती असलेले ‘महाराष्ट्र अहेड’ हे नियतकालिक मार्च 1955 पासून प्रकाशित होत आहे. राज्यात उर्दू भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचवण्याचे काम उर्दू भाषेतील लोकराज्य जानेवारी 1974 पासून यशस्वीपणे करत आहे. राज्यात हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम, निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती राज्यातील हिंदी भाषकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने 1976 पासून हिंदी भाषेतून लोकराज्य प्रसिद्ध केले जात आहे. राज्यात मुंबई व इतर काही ठिकाणी गुजराती भाषकांची मोठी संख्या पाहता गुजराती भाषेतूनही लोकराज्य प्रकाशित करण्यात येत आहे. लोकराज्य च्या online आवृत्तीने महाराष्ट्र राज्याची जगभरात नाविन्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. अशा नविन्यपूर्ण लोकराज्य अंकाला आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत..
आपणास हव्या असलेल्या एप्रिल-2021 लोकराज्य मासिकाचा मराठी अंक डाउनलोड करण्यासाठी खालील start download बटन ला क्लिक करा
 


 
 
 
 
 
 
0 Comments