राज्यस्तर चौथे पारितोषिक, पूर्व प्राथमिक गट, नवोपक्रम स्पर्धा २०२०-२१
महाराष्ट्र
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि
प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या.
शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही
नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे
वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक
प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील
सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत दरवर्षीप्रमाणे
सन २०२०-२१ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
समग्र शिक्षा नुसार SCERT
च्या
कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने सन २०१९-२०
या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत असते.
१)
पूर्व प्राथमिक गट ( अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका )
२)
प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट ( उपशिक्षक, पदवीधरशिक्षक, प्राथमिक मुख्याध्यापक )
३) माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट (
माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक )
४) विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट ( विषय
सहाय्यक, विषय साधन व्यक्ती )
५) अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (
केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता )
ही
स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली असते.वर्षभर कोरोना ( कोविड- १९ ) ची
परिस्थिती असतांना सुद्धा सृजनात्मक
कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन सन
२०२०-२१ या वर्षी दर्जेदार नवोपक्रम
ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर वेळेत सादर केले. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर
ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण झाले. जिल्हास्तरावर बक्षीस पात्र ठरलेले नवोपक्रम
राज्यस्तरासाठी पात्र ठरले आणि राज्यस्तरावर सादरीकरणानंतर पारितोषिक जाहीर झाले.
सर्वच नवोपक्रम दर्जेदार आहेत. त्यातील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिले दहा
नवोपक्रम शिक्षकांच्या सोयीसाठी येथे उपलब्ध करून दिले आहेत. या नवोपक्रमांचे
अवलोकन करून महाराष्ट्रातील नवोपक्रमशील शिक्षकांना नवोपक्रम लेखनाची दिशा मिळेल
अशी आशा आहे. हा नवोपक्रम पाहूया, वाचूया आणि समजून घेऊया तसेच आपल्या शाळेत हा
किंवा असा उपक्रम राबवता येईल, याचा सकारात्मक विचार करू या ...
श्रीमती. तुळसा कृष्णा पाटील
राज्यस्तर चौथे पारितोषिक, पूर्व प्राथमिक गट, नवोपक्रम स्पर्धा २०२०-२१

0 Comments