आपल्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभागी झाले
महाराष्ट्र शासन उपक्रमा अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी या आठवड्यात स्वाध्याय उपक्रमात सहभागी झाले आहेत हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आपण येथे क्लिक केल्यावर metabase नावाची वेबसाईट वरील नवीन पेज ओपन होईल.तेथे आपण सर्वात अगोदर Block नावाच्या tab मध्ये आपला तालुका निवडा नंतर समोरील Grade च्या tab मध्ये आपला class 1 ते class 10 पर्यंतचा वर्ग निवडा नंतर Medium च्या tab मध्ये आपल्या शाळेचे marathi- म्हणजे MR , english- म्हणजे ER व urdu म्हणजे UR पैकी आपले Medium निवडा नंतर Week च्या tab मध्ये सद्याचा आठवडा 21 वा निवडा आपोआप दिसत आहे त्याचबरोबर समोरच्या Academic year tab मध्ये 2020-21 हे वर्ष निवडा आता खाली Participation at school level मध्ये आपला जिल्हा District समोर तालुका Block UDISE CODE स्क्रोल करा व आपली शाळा शाळेचे नावासह आपोआप दिसते त्यापुढे Starts म्हणजे किती मुलांनी रजिस्ट्रेशन केले त्याची संख्या दिसते पुढे Completions म्हणजे किती मुलांनी स्वाध्याय सोडवला त्यांची संख्या दिसते पुढे Accuracy शेकडा प्रमाणात दिसते ही एकंदर सरासरी असते की तुमच्या सर्व मुलांनी स्वाध्याय सोडवला मात्र बरोबर उत्तरांच्या प्रमाणाची येथे आपणास सरासरी दिसत असते अशाप्रकारे आपण आपल्या वर्गातील किती मुलांनी स्वाध्याय सोडवला याची माहिती मिळवू शकतो व ज्या मुलांनी स्वाध्याय सोडवला नाही त्यांच्या पर्यंत पोहचून स्वाध्याय सोडवून घेवून त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आपल्या मोबाईल वर स्वाध्याय सोडवण्याची सुविधा उपलब्ध करून देवू शकतो ही सुविधा आठवडाभर सुरु असते व शनिवारला नवीन आठवडा व नवीन स्वाध्याय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी उपलब्ध असतो आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी मागील आठवड्याचा स्वाध्याय आपण सोडवू शकत नाही त्यामुळे ज्या आठवड्यातील स्वाध्याय त्याच आठवड्यात सोडवणे आवश्यक असते.
0 Comments