या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समग्र शिक्षा नुसार SCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन दरवर्षी करण्यात येत असते. महाराष्ट्रातील स्पर्धकांना नवोपक्रम स्पर्ध्येची ओळख व्हावी म्हणून whatsapp समूह तयार करून त्याद्वारे मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरु केले आहे. आपण या ब्लोग वरील सर्व VIDEOपाहून त्यानुसार नवोपक्रम लिहिला तर १००टक्के यश मिळण्याची शक्यता आहे. या नवोपक्रम स्पर्धेची ओळख करून घेण्यासाठी पुढील VIDEO शेवटपर्यंत पहा.
या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments