१८. नवोपक्रम अहवाल,मूल्यमापन कसे होते ?



या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

१८.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा,नवोपक्रम अहवाल,मूल्यमापन कसे होते ?

नवोपक्रम स्पर्धेचे मुल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरी मध्ये केले जाते. जिल्हा व विभाग स्तरावर (विभाग स्तर हा अंगणवाडी सेविका ,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक यांना लागू नाही ) द्वितीय फेरी ही पाहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येते .

नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग, व राज्यस्तरवर मुल्यांकन ज्या निकषांवर आधारित असते ते निकष, त्यांचे प्रथम फेरीतील १०० गुण, द्वितीय ( सादरीकरनाची फेरी ) फेरीतील ७५ गुण याचे विस्तृत वर्णन VIDEO मध्ये आहे.

सादरीकरनाची तयारी करत असतांना PPT अगोदर तयार करून ठेवावी. त्यामध्ये उपक्रमातील नाविन्यता, नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही, आणि यशस्वीता व उपयुक्तता या तीन मुद्द्यांना समान २५ गुण म्हणजेच एकूण ७५ गुणांची दुसरी सदरीकारनाची फेरी असते. म्हणजेच आपण नवोपक्रम कितीही छान लिहिला असला तरी आपले सादरीकरण छान व मुद्देसूद झाले नाही तर आपण राज्यस्तरावर पोहचू शकत नाही. राज्यस्तरावर जाणेसाठी आपणास कमीत कमी ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

विस्तृत माहिती साठी VIDEO अवश्य पहा.

Post a Comment

0 Comments